कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

राजन तेलिंनी लोकांना भडकावण्याचे काम केले ; दीपक केसरकर

*🛑 राजन तेलिंनी लोकांना भडकावण्याचे काम केले ; दीपक केसरकर*

*🛑 उबाठा गटाने जाहीर केलेल्या पत्रकाची केली केसरकरांनी पोलखोल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात प्रकल्प मंजूर केला. तेथील जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही याबाबतचे लेखी पत्र त्यांना दिलेले आहे. राजन तेलिंनी लोकांना भडकावण्याचे काम केले असून याला तेच जबाबदार आहेत अशी टीका महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उबाठा गटाने जाहीर केलेल्या पत्रकाची पोलखोल केली. महायुतीने लोकांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन श्री. केसरकर यांनी मतदारांना केले.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पत्रक जाहीर केले. माझ्यावर सावंतवाडीची जनता प्रेम करते. सर्व औद्योगिक कारखाने मी आणले. पै काणे यांनी तेथे कारखाने उभारले. चष्म्याचा कारखाना वाफोली येथे उभारण्यात येणार होता. येथील जनरेटर कारखान्यात 600 मुलं काम करत आहे. येथे काही काळात सुरू होणाऱ्या सोलर कारखान्यामध्ये 240 अश्या एकूण 840 नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सावंतवाडी येथील डाटा सेंटरमध्ये काम करणार मुलांचे थकीत पगार मी मिळवून दिले. माझ्याकडे येणाऱ्या औद्योगिक कंपन्यांना मी मदत करण्याचे काम करतो. काजू कारखानदारांना 280 कोटी रुपये मंजूर करून दिले. रत्नसिंधू मधून सावंतवाडी टर्मिनसच्या पाणीप्रश्नी सहा कोटी रुपये मंजूर केले. जीपी विमानतळ सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला मात्र तेथे पुरेशी विमाने येत नाहीत. विमानांची संख्या वाढल्यानंतर तेथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तिलारी येथील युवकांना रोजगारसबंधी वन टाइम सेटलमेंट करून दिली. वेळागर येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल ही माझी संकल्पना असून त्यासाठी निधी मी आणला. त्याचे टेंडर, वर्क ऑर्डर झालेली असून एक सही झाली की याचे काम सुरू होईल. बांबोळी, बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे रुग्णांना तेथे पैसे भरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.
विरोधक माझ्या संपत्तीवरून टीका करत आहे. मात्र माझी संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. माझ्याकडील जमिनींचे दर दुप्पट झाल्याने संपत्तीत वाढ झाली आहे. विकासासाठी माझ्या जमिनींची विक्री केली आहे. लाकडी खेळण्याचे संवर्धन करण्यासाठी येथे म्युझियम उभारण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी डेपो आणि एसटी स्टँड नवीन करण्यासाठी सहा कोटींचा निधी मी दिला आहे. लँडमाफीया उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे. मी सासोली येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांचा जमीन प्रश्न सोडवणार आहे. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्गचा फायदा झाला आहे. ठराविक झाडे कापण्यासाठी वगळण्यात येतील. त्यामुळे दंड आकारता येणार नाही. माझा मायनिंगला विरोध आहे. शिरशिंगे येथील धरणाला 600 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे तसेच पारपोली येथे फुलपाखरांचे गाव वसविण्यात आले आहे.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!