कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

गोवेरी येथील बीएसएनएल टॉवरची सेवा दहा दिवसांत सुरळीत न झाल्यास मनसे करणार आंदोलन..

▪️व्यवस्थापनाकडून डिझेल संपल्याचे कारण देत नियमित तासन-तास सेवा केली जाते ठप्प..

▪️डिझेल चोरीद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचा मनसे उप तालुकाध्यक्ष दिपक गावडे यांचा आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान खासदार बीएसएनएल कंपनीच्या माध्यमातून सर्वत्र मोबाईल टॉवर्सच्या उद्घाटनांचा घाट घालत असताना दुसरीकडे  मात्र अस्तित्वात असलेल्या  टॉवर्सच्या सेवांबाबत ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी जनतेची  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्यासाठी टॉवर्सची उद्घाटने करतात. मात्र, अस्तित्वात असलेल्या जुन्या टॉवरच्या सेवांबाबत डोळेझाक करतात. परिणामी जनतेची गैरसोय होत आहे. याला जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींची अनास्थाच कारणीभूत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएल ची सेवा मोडकळीस येत असल्याची परिस्थिती असताना कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील टॉवरची देखील अशीच अवस्था आहे. रात्रौ दहानंतर मोबाईलची सेवा अक्षरशः ठप्प होते. स्थानिक व्यवस्थापन डिझेल संपल्याचे कारण देत हात वर करते. यामागे जाणीवपूर्वक डिझेल चोरी होत असून भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता आहे. मनसेने याची गंभीर दखल घेतली असून येत्या आठ दिवसांत गोवेरी येथील टॉवरची सेवा सुरळीत व नियमित न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार आहे. याची बीएसएनएल व्यवस्थापनाने वेळीच दखल घ्यावी. ज्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला निष्क्रिय बीएसएनएल चे वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असतील असा इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!