राष्ट्रीय महामार्ग सुधारणा उपक्रमांतर्गत स्थानिक जनतेच्या हक्काच्या व न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनसेने पुकारले जन आंदोलन..

▪️निवेदनातील मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास ३ डिसेंबर रोजी पणदुर तिठा येथील हायवे ब्रिज खाली करणार लक्षवेधी धरणे आंदोलन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.३०: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ सुधारणा व रुंदीकरण उपक्रम जिल्ह्यात सुरू झाल्यापासून महामार्ग विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांवर व स्थानिक जनतेच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात नेहमीच डोळेझाक करण्यात आलेली आहे. त्यामुळे भ्रष्ट व निर्ढावलेल्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानी व नियोजनशून्य कारभाराचा रेटा चालूच ठेवून सर्व सामान्य जनतेच्या हक्काच्या मागण्या दडपून टाकल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवेदने व आंदोलने करून देखील प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष चालू आहे. या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी घेतलेल्या संयुक्त बैठकीत प्रकल्पग्रस्त व स्थानिक जनतेच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही आजपर्यंत फक्त वेळ मारून नेण्याचेच काम महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार व्यवस्थापनाने केल्याचा आरोप मनसेने दिलेल्या निवेदनात केला आहे. त्या अनुषंगाने येत्या गुरुवार दि ३ डिसेंबर २०२० रोजी पणदूर तिठा ब्रिज खाली वेताळ-बांबर्डे, पणदूर, ओरोस अशा गर्दीच्या व नेहमी वर्दळीच्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे दुतर्फा प्रवासी पिकप शेडची बांधणी करणे, हायवेपासून लगतच्या गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांची तात्काळ सुधारणा करणे, महामार्ग भूसंपादन क्षेत्रात आलेल्या वेताळ-बांबर्डे तेलीवाडी येथील नळपाणी योजनेच्या विहिरीचा प्रश्न निकाली काढणे, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा प्रलंबित भूसंपादन मोबदला तात्काळ अदा करणे, पणदूर तिठा मयेकर वाडी येथील हायवेचे पारंपारिक पाण्याचे प्रवाह महामार्गामुळे बंद झाल्याने होणाऱ्या  भातशेती नुकसानीस घालून व परिसरातील घरांच्या संरक्षक बाबींची उपाययोजना करणे, वेताळ-बांबर्डे हातेरी नदी पुलानाजीक पणदूर व बांबर्डे ग्रामस्थांसाठी गणेश विसर्जन घाट बांधणी करणे आदी मागण्यांसाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे. आजपर्यंत महामार्ग विषयक झालेल्या आढावा बैठकांमध्ये  पालकमंत्री महोदयांनी यासंबंधीचे वारंवार तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कारभारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. हा असंतोष व जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेने  लक्षवेधी जन आंदोलन पुकारले असून जनतेनेही  ह्यात उत्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांनी केले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!