कुडाळराजकीयसिंधुदुर्ग

निवेदने आणि आश्र्वासनांची परिस्थिती जैसे थे;  आमदार वैभव नाईकांना मनसेचा टोला

▪️यश आल्यावर आ.नाईक लगेच फोटो काढून श्रेयासाठी आपलीच पाठ थोपतात; किनळेकर यांची टीका

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.११: सर्वच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे  केलेल्या  मागणीमुळे तसेच राज्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी जवळपास सर्वच राज्यांनी दिलेली आहे. यश आले की, कुडाळ-मालवणचे आमदार लगेच फोटो काढून श्रेयासाठी धावतात आणि आपली पाठ थोपवून घेतात. असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला तसेच त्यांनी श्री. नाईक यांच्या अनेक मुद्द्यावरील ‘जैसे थे’ अशी टीका केली.

ते म्हणतात, नुसत्याच दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करण्याआधी श्रेय घेणाऱ्या आमदारांनी घरबांधणी परवानगीचे अधीकार ग्रामपंचायतीला पुन्हा दिल्याचे जाहीर करून आपले व आपल्या मंत्र्यांनचे अभिनंदन करुन घेतले; पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे.

तसेच गेली ७ ते ८ वर्षे बांधून पूर्ण झालेले कुडाळ मधील महिला रुग्णालय आमदार म्हणतात चार महिन्यांत सुरू करणार खासदार म्हणतात दोन महिन्यांत सुरू करणार सांगुन परिस्थिती जैसे थे.

मतदारसंघातील खड्यात गेलेल्या रस्त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला जाहीर केले. मंत्र्यांबरोबर फोटो काढून घेतला निवेदन दिले अभिनंदन करून झाले परिस्थिती जैसे थे च.

मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला समज दिल्याचे भासवून पावशी येथे पाहणी स्टंट करून  परिस्थिती जैसे थे च.

मालवण मधील मच्छिमारांनचे प्रश्र्न थेट समुद्रात जाऊन सोडविण्याचा स्टंट केला, यांच्या पालकमंत्र्यांनी थेट ऐल ए डी मच्छिमारांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून सत्कार करुन घेतला. आमच्या पारंपरिक मच्छीमार बांधवांनची सद्य परिस्थितीत जैसे थे च.

आमदार साहेब! गेल्या सहा वर्षांत खुप झाली निवेदने, स्टंटबाजी, फोटोग्राफी आणि सत्कार तसेच अभिनंदनंदनाचे सोहळे! जरा दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा केला तर आम्हा मतदारसंघातील जनतेवर खूप उपकार होतील.

*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!