शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीचे नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक करतात पदाचा गैरवापर; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप

▪️२७ लाख कोणाच्या खात्यावर कर्ज फेडण्यासाठी गेले त्याची चौकशी करावी; साळगावकर यांची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२०: नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक आपल्या पदाचा गैरवापर करत स्थायी समितीला भाडेतत्त्वावर गाळे चालविण्यास देण्याचा अधिकार नसताना हरुण मलानी या परप्रांतीय गृहस्थाला हॉटेल चंदू भवन शेजारची जागा भाडेतत्वावर देऊन २७ लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. हे पैसे कोणाच्या खात्यावर, कोणाचे कर्ज फेडण्यासाठी गेले, त्याची चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी बोलताना श्री. साळगावकर यांनी केली.

सावंतवाडीत नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ‘उखडे उखडे गॅग’ यांनी या शहराचे लचके तोडण्याचे काम सुरू करून सावंतवाडी शहर संपविण्याचे कारस्थान रचले आहे. शहरातील मोक्याच्या जागा बळकावल्या जात आहेत, तर टीआरसी मध्ये भरत नारायण सिंग राजपुरोहित याला पंधराशे रुपये भाडे ठरवून फक्त पंचवीस हजार रुपये प्रीमियम भरून घेऊन स्थायी समितीत ठराव करून दिलेला आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असून याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप श्री. साळगावकर यांनी यावेळी बोलताना केला.

जे काय मिळेल, ते मी खाणार. या वृत्तीने झपाटलेले सावंतवाडीतील नगरपालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष आपल्या मडुऱ्यातील बागेत साफसफाईसाठी नगरपालिकेचे दहा कर्मचारी सतत पंधरा दिवस घेऊन गेल्याचा आरोप श्री. साळगावकर यांनी केला.

दलित समाजाचा पदवीधर युवक रवी जाधव यांचा गाळा सूडबुद्धीने काढल्यानंतर कर्मचाऱ्यांना कॉकटेल ची पार्टी दिली गेली. हा सत्तेचा उन्माद आहे. एखाद्या गरीब युवकाच्या पोटावर लाथ मारून त्याचा आसुरी आनंद लुटायचा हे कशाचे द्योतक आहे. असा सवाल यावेळी बोलताना श्री. साळगावकर यांनी केले.

सावंतवाडी नगरपालिकेने नगराध्यक्षांच्या सांगण्यानुसार जो अनावरस अहवाल तयार केला. त्याला ना आई! ना बाप! त्या अहवालावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नाही. फक्त व्यापाऱ्यांना घाबरवायचे व पैसे लुटायचे हा त्यामागचा हेतू होता. अशा प्रकारे दहा व्यापाऱ्यांना त्या अहवालाचा बडगा दाखवून सुमारे २५ लाख रुपयांना लुटले गेले. हे ‘उखडे उखडे’ यांचे काम आहे. हे सर्व पैसे कोणी-कोणी वाटून घेतले, संबंधित कालावधीत कोणाच्या खात्यावर किती पैसे जमा झालेत, कोणी आपले बँकेचे कर्ज भरले, याची चौकशी खात्यांतर्गत करावी अशी मागणीही यावेळी श्री. साळगावकर यांनी केली.

शहरातील जी कामे होत आहेत, ही सर्व कामे माझ्या कारकिर्दी मधील मंजूर कामे आहेत. काझी बुद्धीन हाॅल हा माझ्या कारकिर्दीत मंजूर केला गेला आहे व तो पूर्णत्वास  आला आहे. त्या हॉलची देखभाल दुरुस्तीसाठी एक त्रिसदस्यीय कमिटीने नेमून तो चालविण्यास द्यावा अशी मागणी यावेळी श्री. साळगावकर यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत हॉटेल चंदू भूवन शेजारी रियाज हरुन मलांनी याला दिलेला गाळा आम्ही उभा करू देणार नाही. जे बेकायदेशीर ठराव केले आहेत. ते सर्व ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाईल. त्यासाठी चार जेष्ठ वकिलांची नियुक्ती केली आहे. असे श्री. साळगावकर यांनी स्पष्ट केले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!