डॉ. खानोलकर यांचे घर पाडून चार लाखाचे सामान चोरून नेल्या प्रकरणी आंबोलीतील बारा गावडेंविरुद्ध गून्हा दाखल..
▪️बेकायदा जमाव करून जेसीबी ने घर तोडून दहा लाखाचे नुकसान व सामानाची चोरी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०६: आंबोलीतील डॉ. अरविंद खानोलकर यांचे घर बेकायदा जमाव करून जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून घराचे सामान व आतील किंमती सामान चोरुन नेल्या प्रकरणी प्रकाश सखाराम गावडे, बाळकृष्ण गोविंद गावडे, बाळकृष्ण नारायण गावडे, श्रीम.शोभा बाळकृष्ण गावडे, दिलीप गोविंद गावडे, लक्ष्मण चंद्रकांत गावडे, कल्पेश चंद्रकांत गावडे, उर्मीला लक्ष्मण गावडे, आनंद लक्ष्मण गावडे, मनोहर लक्ष्मण गावडे, प्रथमेश बाळकृष्ण गावडे, संतोष लक्ष्मण गावडे यांच्यावर सावंतवाडी प़लिस स्थानकात भा.द.वी. कलम १४२, १४३, १४९, ४४७, ४४८, ४२७, ३७९-२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिलींद अरविंद खानोलकर, वय ४५ वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. संजीवनी हॉस्पीटल, सालईवाडा, यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यात असे म्हटले आहे की, माझे वडील डॉ. अरविंद खानोलकर यांनी गाव मौजे आंबोली, ता. सावंतवाडी येथे सब्व्हे नं.८४, हि.नं.३ या जमिन मिळकतीपैकी क्षेत्र (हे.आर.) ०-०९-८० ऐवढे क्षेत्र दिनांक ०४ मे १९७७ रोजी रजिस्टर्ड खरेदी खताने खरेदी केलेले आहे. सदर जमिन मिळकती मध्ये आमचे मालकीचा ग्रामपंचायत आंबोली, ता.साबंतवाडी ग्रामपंचायत इमला नं. ५६२ चा इमला आहे. सदर इमल्याचा सन २०१८-२०१९ पर्यंतचा मी ग्रामपंचायत कर भरलेला आहे. आमचे कुटुंबिय व मित्र सुट्टीचे दिवशी सदर घरामध्ये राहणेकरीता जातो. परंतु सद्या मार्च महीन्यापासुन कोवीड-१९ या महामारीच्या रोगाने संपूर्ण देशात थैमान घातलेले असल्याने तसेच आम्ही सर्व कुटुंबिय वैद्यकीय सेवेत असल्याने सदर कालावधीत आम्हाला आंबोली येथे जाऊन राहणे तसेच सुट्रीचा कालावधी व्यतीत करणे शक्य झालेले नाही. सदर मिळकतीची सर्व अधिकार माझ्या वडीलांनी माझ्या नावे करुन दिलेली आहेत.
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२० रोजी रात्रौ मी माझे निवासस्थानी संजीवनी बालरुग्णालयात असताना रुग्णालयाचा लॅन्डलाईन क्रमांक ०२३६३-२७२१०५ यावर मला फोन आला. फोनवरील समोरच्या व्यक्तीने आपण “आंबोली येथील गावडे बोलतोय, मी बऱ्याच वेळा आपणास फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आपला फोन लागला नाही. आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते १२ वागण्याच्या दरम्याने वरील दहा ते बारा जणांनी आपले मालकीचे आंबोली येथील घरातील सामान व घर जमिनदोस्त करुन घराचे दरवाजे, लोखंडी अँगल, पत् यांनी काढुन घेवुन गेलेले आहेत व आपले घर जेसीबीच्या साहाय्याने पाडुन टाकलेले आहे.” अशी फोनद्वारे माहीती दिली. सदर वेळी रात्र झालेली असल्याने तसेच रुग्णालयामध्ये पेशंट असल्याने मी दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता आंबोली येथे स्वत: प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता आमचे मालकीचे आंबोली ग्रामपंचायत इमला नं ५६२ हे घर जमीनदोस्त केलेले असुन सदर घरातील सर्व सामान चोरी झाल्याचे मला दिसुन आले.
सदरचा प्रकार पाहुन मी भांबाबुन गेलो. सदर घरामधील चार सागवानी दरवाजे, चार सागवानी खिडक्या, १० टोप, १० चमचे, १ गॅस स्टोव्ह, १ केरोसीन स्टोव्ह, १ कुकर, १५ वाट्या, ४ अल्युमिनीअमचे डबे, १० ताटे, २ पितळेचे तांबे, १ सेरा कंपनीचा कपसेट, २ निलेप कंपनीचे तवे, २ टेबल, ४ खुच्च्या, ३ जाजम, ४ गाद्या, ६ चादरी, ४ स्टुल, २ स्टील बादल्या, १ पत्र्याची पेटी, ४ एलईडी बल्ब, मायक्रोटेक कंपनीचा इनव्हटर, घरावरील लोखंडी अँगल व त्यावरील पत्रे असे सुमारे ४ लाखाचा माल माझे मालकीचे घर तोडून चोरुन नेले व घराचा सुमारे ६ लाखाचा इमला जमिनदोस्त केल्याचे मला दिसुन आले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान सावंतवाडी पोलिस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. ए. सय्यद करीत आहेत. पोलिस आरोपींना कधी अटक करतात याकडे सर्व डाॅक्टर संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

