३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गडकोट पर्यटन स्थळे ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान धूम्रपान पार्ट्या फटाके फोडणे यास प्रतिबंध घालावा..
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलिस ठाण्याला देण्यात आले निवेदन
ब्युरो चीफ – विशाल पित्रे
सावंतवाडी – सध्या पाश्चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे आपल्या देशातही गुढीपाडव्याऐवजी नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. या रात्री युवकांचे मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढलेआहे. काही ठिकाणी रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण केले जाते, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावून त्यांच्यातालावर अश्लील अंगविक्षेप करून नृत्य केले जाते. तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकारहोऊन एकूणच कायदा अन् सुव्यवस्था संदर्भात गंभीर स्थिती निर्माण होत आहे.हे अपप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्यारात्री महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिकठिकाणी मद्यपान-धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा.
पोलिसांच्या वतीने गस्तीपथके चालू करणे, अपप्रकार करणार्या तरुणांना कह्यात घेणे, वेगाने वाहने चालवणार्यांवर त्वरित कारवाईकरणे,फटाक्यांतूनहोणार्या प्रदूषणाविषयी जनतेला जागृत करणे, अशा काही उपाययोजना केल्यास या अपप्रकारांनाआळा बसेल,या हेतूने हिंदुजनजागृती समितीच्या वतीने दि . २१ डिसेंबर या दिवशी सावंतवाडी पोलीस प्रशासन , पंचम खेमराज महाविद्यालय,देशभक्त शंकर राव गवाणकरकॉलेज ऑफ कॉमर्स प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.

