भिरवंडे आरोस हे ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर सावंतवाडी तालुक्यात भाजप सेनेमध्ये टक्कर
कोलगाव, मळगांव, इन्सुली, तळवडेत भाजप पुरस्कृत पॅनलचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी सावंतवाडी : प्रतिनिधी
भाजपचा जल्लोष सुरु ..कोलगावात भाजपचे संतोष राऊळ, आशिका सावंत यांचा विजय … मळगाव, तळवडे, इन्सुली तही पहिल्या प्रभागात भाजपचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी
जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा भाजपला धक्का*
*💫कणकवली दि.१८-:* भिरवंडे ग्रामपंचायतीत शिवसेनेने भाजपाला क्लीन स्वीप दिला आहे. ७ पैकी ७ जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पुन्हा एकदा भिरवंडे गावावर एकहाती वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांची रणनीती पूर्णपणे फसली आहे. भिरवंडे गावातील ४ सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग १ मधूनअंकिता सावंत प्रभाग २ मधून नितीन सावंत, रश्मी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सावंतवाडी दि.१८-:* आरोस ग्रामपंचायत शिवसेना पुरस्कृत ग्राम विकास पॅनल चे सर्व उमदेवार विजयी झाले असून, ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे
वैभववाडी प्रतिनिधी
सोनाळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का सातपैकी शिवसेना पँनेलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या पदरात केवळ दोनच जागा प. स. सदस्य अरविंद रावराणे यांच्या वर्चस्वाला धक्का
