राजकीयसावंतवाडी

कोळगाव मध्ये भाजपचे कमळ फुलले.. महेश सारंग ठरले किंगमेकर.

 

कोळगाव ग्रामपंचायत अखेर सेनेकडून खेचून आणली भाजपने भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग ठरले किंगमेकर

विद्यमान जि प सदस्य यांचे भाऊ पराभूत

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या कोलगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरु होता. मात्र, आतापर्यत नऊ जागा जिंकत भाजपने सत्ता मिळविली आहे. पहिल्या प्रभागातील तीनपैकी दोन जागा भाजप तर एक जागा शिवसेनेने पटकावली. दुसऱ्या प्रभागात शिवसेनेने दोन तर भाजपने एक जागा मिळविली. मात्र, तिसऱ्या प्रभागात तिन्ही जागा भाजपने पटकावत शिवसेनेला धक्का दिला. चौथ्या प्रभागातही सर्व उमेदवार भाजपचे निवडून आले. त्यामुळे नऊ जागांसह भाजपने सत्ता घेतली आहे. विजयी उमेदवार -भाजप- संतोष राऊळ, आशिका सावंत, संदीप हळदणकर, रसिक करमळकर, प्रणाली तिळवे, रोहित नाईक, दिनेश सारंग, हेमांगी मेस्त्री, आत्माराम चव्हाण शिवसेना प्रतीक्षा धुरी, गौरी करमळकर, शिवदत्त घोगळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!