ओसरगाव येथील माजी उपसरपंच बबली राणे यांचे उपोषण मागे..
▪️आ.नितेश राणे व कार्यकारी अभियंता यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याची राणे यांची प्रतिक्रिया..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कणकवली,दि.१८: तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत ओसरगाव तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. याकरिता ओसगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांच्यासह ग्रामस्थ सुदर्शन नाईक आदींनी १५ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर रविवारी मागे घेण्यात आले.
ओसरगाव तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी नाही. अशा स्थितीत राज्य सरकार या तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करू शकत नाही. राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीएसआर निधीतून आपण ओसरगाव तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधी मधून तलावाच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला असलेला रस्ता करण्यासाठी दहा लाखाचा निधी प्रस्तावित आहे. तसेच जलसंपदा विभागामार्फत गाळ काढणे व गळती काढणे ही कामे प्रस्तावित आहेत. तलावाच्या पर्यटन विकासाची जबाबदारी मी घेतली असून पर्यटन विकासासाठी ओसरगाव तलावाला सीएसआर निधी आणून मागण्या मान्य केल्या जातील. असे ठोस आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.
आमदार नितेश राणे व कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याची प्रतिक्रिया बबली राणे यांनी दिली.
कणकवली सभापती मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपविभागीय अधिकारी पी.आर. पाटील, कनिष्ठ अभियंता बी.एच. तरटे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही.पी. लिंग्रज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, कणकवली तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनीही बबली राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. बबली राणे यांच्या मागणीबाबत राष्ट्रवादीचे नेते जलसंपदामंत्री जयवंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे लक्ष वेधले. यानुसार बबली राणे यांच्या मागणीनुसार प्रस्ताव परिपूर्ण करा व शासनाकडे पाठवा यांचा आपण पाठपुरावा करू असे आश्वासन अबीद नाईक यांनी दिले.
_*🔥हदयरोगावरील सर्व विनाशस्त्रक्रिया उपचारासाठी भारतातील उत्कृष्ठ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी सेंटर..🏥*_
*💥मंगळवार दि. १९ जाने. २०२१ रोजी..*
*💫सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण..*
*💫दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..*
♨️ (नावनोंदणी आवश्यक) ♨️
_🌈डॉ.जयवंत खबाले हृदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील.._
_🌈गेल्या २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार.._
_🤷🏻♂️बायपास टाळा.. ॲन्जिओप्लास्टी टाळा.. हृदयविकार टाळा.. निरोगी राहा..🤷🏻♀️_
*🏬 आमचा पत्ता ⬇️*
*🏥 शनिकृपा हार्टकेअर सेंटर*
⭕प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
⭕दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*💁🏻♂️ संपर्क ⬇️*
*📱9689008081*
*📱9960316318*
_⭕Arterian Therapy, EECP, Chelation Therapy, Vit-C Therapy, Ozone Therapy, Ayurveda._
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

