ग्रामपंचायत निवडणूक निकालापूर्वी शिवसेनेचा भाजपला धक्का..
▪️शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या माध्यमातून सांगिर्डेवाडीतील राणेसमर्थक शिवसेनेत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१८: शहराजवळील सांगिंर्डेवाडी येथे शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. येथील २५ ते ३० राणेसमर्थक, भाजप कार्यकर्त्यांनी काल रविवारी ग्रामपंचायत निवडणूक निकालापूर्वी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदर वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या माध्यमातून तर अमित राणे यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आला.

दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार अमित विजय राणे यांची सांगिर्डेवाडी शिवसेना शाखाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. तर सांगिर्डेवाडी बूथ प्रमुखपदी विजय परब यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी अमित राणे यांच्या सोबत दशरथ राणे, रवींद्र राणे, प्रथमेश राणे, महेश राणे, दीपक राणे, वैभव परब, अमित परब, नंदकिशोर परब, सुशांत परब, समीर वालावलकर, गौरेश ओसरगावकर, रश्मी ओसरगावकर, समीर बर्वे, अम्येय परब, प्रमोद राणे, साई पारकर, सुधीर परब, तेजस्वी परब, बाळकृष्ण परूळेकर आदी प्रवेशकर्त्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मुंबई महपौर दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल बंगे, विकास कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी, रुपेश पावसकर, नगरसेवक सचिन काळाप, नगरसेविका मेघा सुकी आदी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

