कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

महादेवाचे केरवडे येथील बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करा; ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

▪️येत्या आठ दिवसात टॉवरचे काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा केरवडे वासियांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : कुडाळ

🎴कुडाळ,दि.१६: तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे गेल्या तीन वर्षात फक्त पाया बांधकाम पूर्ण झालेले तसेच पुढील कामाचे साहित्य धूळ खात पडलेल्या बीएसएनएल टॉवर चे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करा. अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा महादेवाचे केरवडे ग्रामस्थांनी विभागीय अधिकारी भारत संचार निगम लि. सावंतवाडी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, खासदार विनायक राऊत, पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग, पोलीस निरीक्षक कुडाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महादेवाचे केरवडे वासीयांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, गाव मौजे केरवडे क. नारूर गावासाठी सन २०१७/१८ मध्ये बीएसएनएल टॉवर मंजुर झालेला आहे. मात्र, या ३ वर्षात टॉवरचा पाया बांधकाम फक्त पुर्ण झालेले आहे. टॉवरच्या पुढील कामी लागणारे विद्युत जनरेटर, पाईप, वायर इ. साहित्य गावात धुळ खात पडलेले आहे. गावात कोणत्याही प्रकारची नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना नेटवर्कबाबत गैरसोय निर्माण होते. सध्या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाला महत्व प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात नेटवर्कसाठी जावे लागते. त्यामुळे हा टॉवर सुरू होणे गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

सद्यस्थितीत ३ वर्षापुर्वी टॉवर मंजुर होऊन देखिल टॉवरचे काम अपुर्ण का राहिले? असा प्रश्न आम्हा ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ जर हा टॉवर २६ जानेवारी पुर्वी कार्यान्वित न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच मंगळवार दि. २६/०१२०२१ रोजी सकाळी १० वाजेपासुन ग्रामपंचायत केरवडे क. नारूर कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी व कार्यवाही करावी. असे महादेवाचे केरवडे वासियांनी निवेदनात म्हटले आहे.

_*🔥हदयरोगावरील सर्व विनाशस्त्रक्रिया उपचारासाठी भारतातील उत्कृष्ठ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी सेंटर..🏥*_

*💥मंगळवार दि. १९ जाने. २०२१ रोजी..*
*💫सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण..*
*💫दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..*
♨️ (नावनोंदणी आवश्यक) ♨️

_🌈डॉ.जयवंत खबाले हृदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील.._

_🌈गेल्या २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार.._

_🤷🏻‍♂️बायपास टाळा.. ॲन्जिओप्लास्टी टाळा.. हृदयविकार टाळा.. निरोगी राहा..🤷🏻‍♀️_

*🏬 आमचा पत्ता ⬇️*
*🏥 शनिकृपा हार्टकेअर सेंटर*
⭕प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
⭕दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*💁🏻‍♂️ संपर्क ⬇️*
*📱9689008081*
*📱9960316318*

_⭕Arterian Therapy, EECP, Chelation Therapy, Vit-C Therapy, Ozone Therapy, Ayurveda._

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!