🛑 आत्महत्या केलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला
🛑 घटनास्थळावर सापडली होती गाडीसह मोबाईल व चप्पल
🛑 आत्महत्या असल्याचा पोलीसांचा संशय
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी ,दि -५:- माडखोल येथील धरणात बुडालेल्या कोलगांव येथील युवकाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून अक्षय जनार्दन साईल ( २८, रा. कोलगाव भोमवाडा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान मृतदेह सापडलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराच्या अनुषंगाने त्याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर पैशांच्या देवघेवीतून ही आत्महत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याची काही जणांच्या नावाचाही उल्लेख आहे.
माडखोल धरणालगत बुधवारी सकाळी एक इलेक्ट्रिक स्कूटर तसेच मोबाईल व चप्पल आढळून आली होती. त्यामुळे धरणात कोणीतरी बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल होत शोध सुरु केला होता. त्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकही गोळा झाले. तसेच संबंधित व्यक्ती बुडाली की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क सुरू होते.
दरम्यान, कोलगाव येथील एक तरुण मंगळपासून बेपत्ता असून त्याबाबतची खबर रात्री उशिरा त्याच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसांत दिली होती. त्यामुळे कोलगाव परिसरातील ग्रामस्थही या ठिकाणी जमा झाले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नव्हता. मात्र गुरुवारी सकाळीच हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांच्या स्थानिक उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

