वेंगुर्ले : राष्ट्रीय लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली
वेंगुर्ले : राष्ट्रीय लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाल
वेंगुर्ले
वेंगुर्ले दिवाणी न्यायालय येथे शनिवार २७ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व वादपूर्व ३१ अशी एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील मिळून एकूण १३ कोटी ७८ लाख ६ हजार ७७३ रुपये एवढी रक्कम या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वसूल करण्यात आले.
वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघटना, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन वेंगुर्ले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा
दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीत वेंगुर्ले तालुक्यातील दिवाणीकडील २ प्रकरणे, फौजदारी कडील १८ प्रकरणे, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विवीध बँका व विद्युत विभाग, वेंगुर्ले यांच्याकडील ३१ वादपूर्व प्रकरणे अशी ५१ तडजोडीने मिटविण्यात आली. या लोकअदालतीमध्ये पॅनेलप्रमुख म्हणून ‘वेंगुर्ले दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. रायरीकर व पॅनेल सदस्य म्हणून अॅड. पूनम नाईक यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक, एस. एस. कांबळे, एस. के. खेडेकर, वकील वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

