कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

माजगाव येथील तरुणाचे आकस्मिक निधन

*🛑माजगाव येथील तरुणाचे आकस्मिक निधन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴माजगाव, दि-३०:-* गोव्यात कामावरून घरी येत असताना दोन दिवसांपूर्वी पणजी येथे अचानक अस्वस्थ झालेल्या माजगाव- भटवाडी येथील महेश बाळकृष्ण कांबळे (३८) या तरुणाचे अखेर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या युवकाच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच माजगाव परिसरात शोककळा पसरली. तर या तरुणाच्या अकाली निधनाचा कांबळे कुटुंबियांना धक्काच बसला.
मूळचे राजापूर येथील कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून माजगाव गरड त्यानंतर माजगाव भटवाडी येथे वास्तव्यास आहेत. महेश कांबळे हा गोवा वेर्णा येथे एका कंपनीत कामाला होता. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने तो सकाळीच घरी माजगाव येथे यायचा. दोन दिवसांपूर्वी तो शुक्रवारी सकाळी घरी
येत असताना पणजी स्टँडवर अचानक अस्वस्थ होऊन खाली कोसळला. त्यानंतर त्याला गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल केले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान अखेर त्याचे निधन झाले. सोमवारी दुपारी त्याचे पार्थिव माजगाव येथे आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी धाव घेत कांबळे कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात सावंतवाडीत अंत्यसंस्कार कण्यात आले. महेश याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचेचे निवृत्त कर्मचारी बाळकृष्ण कांबळे यांचा तो मुलगा तर मळगाव इंग्लिश स्कूलचे कर्मचारी बाळा जाधव यांचे ते जावई होत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!