दगड खाणींच्या सुरंग स्फोटामुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे…
निगुडे,-सोनुर्ली मार्गावर काळा दगडाची ओव्हरलोड वाहतूक
ब्यूरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग
बांदा: – निगुडे येथे आज सावंतवाडी तहसीलदार यांच्या आदेशानुसार सोनुर्ली, इन्सुली व व्येत्ते आदी गावातील दगड खाणींच्या सुरंग स्फोटामुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे गेले होते अन्य बाकी राहिलेल्या घरांची पंचयादी घालण्याचे काम सुरु होते निगुडे,-सोनुर्ली मार्गावर काळा दगडाची ओव्हरलोड वाहतूक निगुडे गावातून दररोज रात्रंदिवस केली जाते यासंदर्भात सावंतवाडी तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन सिंधुदुर्ग यांना निगुडे ग्रामपंचायतीने वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले म्हणून आज पंचयादि घालत असताना मडुरा मंडळ अधिकारी श्री अशोक पवार यांनी निगुडे गावातून जाणारी डंपर वाहतूक सावंतवाडी तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांच्या आदेशानुसार रोखली व त्यांना समज दिली की तुम्हाला पर्यायी मार्ग असताना तुम्ही जर निगुडे गावातून अशाप्रकारे वाहतूक केली तर तुमच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल डी.बी.एल.कंपनी चे व्यवस्थापक श्री फाटक यांच्याशी भ्रमणध्वनी चर्चा केली निगुडे गावातून दिवसाला ५० ते ६० डंपर वाहतूक होते या वाहतुकीमध्ये ते आरटीओ विभागाचा हात असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही भविष्यात याठिकाणी कुठचीही ही दुर्घटना किंवा अपघात झाल्यास संबंधित जबाबदार राहील रस्ता अरुंद असल्यामुळे मोऱ्या खचल्या आहेत तसेच रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे कोसळलेली आहे या सर्व घटनेला संबंधित यंत्रणा जबाबदार असून जर कारवाई नाही झाली तर आरटीओ विभाग समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे आज निगुडे गावामध्ये २० घरांची पंचयादी करण्यात आली यात सर्वच घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निगुडे गावात एकूण १७६ घरांना तडे गेले आहेत पंचंयादी करते वेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, पोलीस पाटील श्रीमती. सुचिता मयेकर,मडुरा मंडळ अधिकारी श्री.अशोक पवार, निगुडे तलाठी श्रीमती. भाग्यलक्ष्मी शिंदे, कोतवाल सुधाकर जाधव आदी उपस्थित होते