दारू धंद्याशी निगडीत असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे कोकण लाईव्ह चे आवाहन
अवैद्य दारू च्या पैशावर राजकारण करून पाहणाऱ्यांना मतदारांनी घरी बसवावे
संपादकीय- सिताराम गावडे
सावंतवाडी – तालुक्यातील अकरा ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे, या निवडणुकीत शिवसेना, भाजप ,राष्ट्रवादी ,काँग्रेस ,मनसे हे पक्ष आपापले नशीब आजमावत आहेत, गाव पातळीवर पक्षाची अधिकृत निशाणी नसली तरी पक्षाच्यावतीने पॅनेल उभे करून राजकीय रणधुमाळी रंगलेली दिसत आहे.मात्र यावेळच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार अवैद्य दारू धंद्याची निगडीत आहेत,ज्यांच्या घरातील व्यक्ती अवैद्य दारू धंद्यात आहे, अवैद्य दारूच्या पैशावर जे राजकारण करत आहेत त्यांनी आपली पिढी बरबाद केली आहे,आपल्या मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे, त्यामुळे अशा उमेदवारांना किंवा त्यांच्या या भाऊबंदांना मतदान न करता निवडणुकीतून हद्दपार करावे अशी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल तर्फे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे.
गेले तीन महिने गोवा राज्यातून येणाऱ्या अवैद्य मध्ये पुरवठा बाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने आवाज उठविल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन, खडबडून जागे झाले, राज्य स्तरावरून या अवैद्य दारू वाहतूकी बाबत कठोर पावले उचलली यामुळे हप्ते खाणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा मनात नसताना दारू पकडावी लागली हेच कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे यश आहे.
या दारू धंद्याला टक्के साठा टक्के तरी निर्बंध घालायला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल यशस्वी ठरला आमच्या या मोहिमेला आपल्याला साथ द्यायची असेल तर आपण आपल्या प्रभागातून ,आपल्या गावातून , दारू धंद्याच्या निगडीत,संबंधित किंवा त्यांच्या कुटुंबातील जी व्यक्ती उभी असेल तिला मतदान न करता राजकारणातून हद्दपार करावे जेणेकरून अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकून पुढे गावात दारू धंदे राजरोसपणे चालविण्याची त्यांना परवाना मिळणार नाही याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायचीआहे. आपल्या गावात दारू धंद्याची संबंधित कोण व्यक्ती आहे किंवा कोण धंदा करतो याची खडानखडा माहिती गावातील ग्रामस्थ असते म्हणूनच अशा व्यक्तीला त्याच्याशी गोड बोलून त्याला कोणताही थांगपत्ता न लागू देता मतदान प्रक्रियेत त्याच्यावर काट मारून गायब करावे व स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला मतदान करावे अशी आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे.
सावंतवाडी तालुक्याचा विचार करता या विषारी दारुमुळे अनेकांचे जीव गेले आहेत,अनेक तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नवयुवकांना आपला जीव गमवावा लागला आहे, गोव्यातून येणारी ही विषारी दारू प्यायल्यामुळे एका वर्षात अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे व ही दारू विकणारे बक्कळ पैसा मिळवून करोडपती झाले आहेत, तर अनेकांची मुले निराधार झाली आहेत, अलिकडचेच उदाहरण घ्यायचे झाले तर कोलगाव मध्ये एका ५० वर्षीय महिले सोबत शय्या सोबत करायला गेलेली मुले दारु धंद्याशी निगडित होती. झटपट मिळालेल्या पैशाच्या जोरावर शय्या सोबत करायला गेले व ती बाई गुदमरून मेली त्यावेळी तिला अंबोली घाटात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात आली.मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या अल्पवयीन मुलांना सध्या जेलची हवा खावी लागत आहे , त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे,,हे फक्त दारू धंदा मुळेच,त्यामुळे माझी प्रत्येक गावातील ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की ,आपली भावी पिढी सुदृढ, सुखरूप, कार्यक्षम, असायला हवी असेल तर या दारूधंदे शी निगडीत असलेल्या उमेदवाराला किंवा त्यांच्या भाऊबंदिना किंवा त्यांच्या नातेवाईकांना या निवडणुकीतून हद्दपार करा ..जेणेकरून पुन्हा पुढच्या निवडणुकीला अवैध धंद्याशी संबंधित असणारी व्यक्ती निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही….
चला तर आपण सारे संघटित होऊ या अवैद्य दारू धंदेवाल्यांच्या मुळाशीच घालू या
दारूधंदा करणारा ,दारू धंद्याला समर्थन देणारे दारूधंदे शी निगडीत असलेले, दारू धंदेवाल्यांना आपल्या पक्षात ठेवणाऱ्या प्रत्येकाला,अद्दल घडवू या
व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून देऊया.