Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

निवेदन सादर केल्यानंतर दोन महिने उलटूनही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय, ओरोस सहीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

🟥निवेदन सादर केल्यानंतर दोन महिने उलटूनही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय, ओरोस सहीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

🟥न्हावेली- आरोस-आरोँदा रस्ता ते माऊली मंदिर रस्ता व शिरोडा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ प्रतिक्षेत..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,दि.४: न्हावेली- आरोस-आरोँदा रस्ता ते माऊली मंदिर रस्ता व शिरोडा मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्यासहित सरपंच न्हावेली तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय,ओरोस व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडे निवेदन सादर करुन दोन महिने उलटले. मात्र 9 मार्च 2022 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात,मागणी करण्यात आलेल्या मौजे ग्रामपंचायत न्हावेली मधील या नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्ती बाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
शासकीय यंत्रणे कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने वाहनचालक-मालक, पादचारी यांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. या त्रासाबद्दल तक्रार मांडण्यात आली मात्र न्हावेलीतील त्रस्त ग्रामस्थ अनंत पुरुषोत्तम नाईक यांच्यामार्फत सरपंच ,न्हावेली ग्रामपंचायत यांच्यासहीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय ओरोस व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या या लेखी निवेदनात, ‘ मौजे ग्रामपंचायत न्हावेली अंतर्गतच्या या रस्त्याचे काम
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मागील वर्षभरापासून सुरू आहे.मात्र अजूनही काही कामे अपूर्ण राहिली आहेत.या कामांमध्ये रस्त्याचा काही भाग व काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे,रस्त्याच्या गटाराला घातलेले काही पाईप तुटल्यामुळे गटार बंद झालेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खराब असून यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. तसेच काही ठिकाणी गटार बुजलेले आहेत, रस्त्या लगतची झाडे व झुडपे वाढली आहेत, तसेच रस्त्यालगत लावण्यात आलेली स्ट्रीट लाईट नादुरुस्त झाली असून स्ट्रीट साईटचे खांब वाकलेले आहेत. काही ठिकाणी पुर्णपणे जमिनदोस्त झाले आहेत. हे खांब तेथून हलविण्याबाबत संबंधित प्रशासनास वारंवार कळवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
यामुळे हे खांब पावसाळ्यात कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी (जसे मनुष्य व प्राणी) होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत संबंधित प्रशासनासहीत संबंधित ठेकेदारांना कल्पना देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी कामे अर्धवट सोडून देण्यात आली आहेत.
ही धोकादायक ठरू शकणारी बाब ध्यानात घेऊन येथील ग्रामस्थांनी ही कामे येत्या 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण न झाल्यास या विरोधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान अर्जदार अनंत पुरुषोत्तम नाईक यांनी या सर्व कामांची लवकरात लवकर पुर्तता करुन व जलदगतीने प्रयत्न करुन लवकर दुरुस्ती करण्यात यावी. पुर्तता न झाल्यास योग्य ते पाऊल उचलले जाईल. कोणत्याही प्रकारची नुकसान ठरणारी घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरपंच, न्हावेली ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!