शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले एकत्र;खेळीमेळीच्या वातावरणात सावंतवाडीतील झाली भुमिपूजने
सावंतवाडी दि.२४ जून (प्रतिनिधी)
सावंतवाडी नगर परिषदेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी आज शिवसेना आणि भाजपाचे नेते व पदाधिकारी एकत्रित आले. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज एकत्रित भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
सावंतवाडी शहरात महामार्ग क्र. १७ पासुन अँड बावकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याचे भूमिपूजन,प्रभाग क्र. ४ मध्ये गुलमोहर कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणे भूमिपूजन ,पांजरवाडा येथे पुल बांधणे,
सालईवाडा हेरेकर ग्राऊंड शेजारील वहाळाची रिटेनिंग वॉल बांधणे ,
कवठणकर यांच्या घरापासून डॉ. सावंत ( महादेव भाटले ) यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे तर सुवर्ण कॉलनी येथे ओपन जिम बसविणे भूमिपूजन करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, गटनेत्या आनारोजीन लोबो, राजू बेग,शहरप्रमुख नगरसेवक सर्वश्री खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, नासिर शेख आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.
तसेच युवा नेते संदेश पारकर संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी, पंचायत समिती माजी सदस्य नारायण राणे, अशोक दळवी, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते
सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी झालेल्या भूमिपूजन प्रसंगी तेथील नागरिक देखील रुपयाची उपस्थित होते बिरोडकरटेंब सुवर्ण काॅलनी येथे पत्रकार सिताराम गावडे यांच्या हस्ते देखील श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकारी नगरसेवक आणि नेत्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती दर्शवली होती.

