कणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

आशिये येथील माजी सरपंच सौ.रश्मी बाणे यांच्यासह काही भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल.

 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रवेश

प्रतिनिधी – रविकांत जाधव

कणकवली – येथील आशिये गावच्या माजी सरपंच सौ रश्मी बाणे यांनी रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत विद्याधर चव्हाण संदीप ठाकूर अभिषेक बाणे सिद्धेश बाणे आदी ग्रामस्थांनी गावातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
रश्मी बाणे या आशिये गावच्या बिनविरोध सरपंच राहिल्या आहेत. भाजप पक्षाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. गावात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्यामुळे बाणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राणेंना आणि भाजपला हा मोठा खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख अनुप वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तर आशियेतील शिवसैनिक जगन्नाथ आजगावकर, शाखाप्रमुख संदीप जाधव, सुदर्शन गुरव, अमोल आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला.

यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, अप्पा पराडकर, अतुल रावराणे, नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, अनुप वारंग, निसार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!