कांदळवन तोडणाऱ्यांवर कारवाई करा मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी
ग्रामस्थांची वन विभागाकडे मागणी; मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा..
सावंतवाडी ता.११: तळवणे गावात सुरू असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावंतवाडी वन विभागाला भेट देत चर्चा केली.यावेळी कांदळवन विभागाचे सिंधुदुर्गातील मुख्य कार्यालय मालवण येथे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी याबाबतची तक्रार करावी,त्यानंतर संबंधित विभाग याची नक्कीच दखल घेईल, असे सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार,आरोंदा कांदळवन समितीचे सदस्य गोकुळदास मोठे,बाबुराव भोगले,दिनेश भोगले आदी उपस्थित होते.
तळवणे गावात कांदळ वनाची अवैद्य तोड होत आहे.मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत,असा आरोप करत तेथील ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी कांदळवन विभागाचे मुख्य कार्यालय मालवण येथे आहे.त्यामुळे या मागणी संदर्भातील तक्रार अर्ज त्याठिकाणी नेऊन द्यावा,त्यानंतर संबंधित विभाग त्यावर नक्कीच कारवाई करेल, असे श्री.जळगावकर यांनी सांगितले.
f