🛑 यंदाचा लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संतोष तळवणेकर यांना जाहीर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२१:– अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.
श्री. संतोष तळवणेकर हे गेली 20 वर्षे सावंतवाडी तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. कोरोना कालावधीत त्यांनी समाजहित व विद्यार्थीहित जोपासत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले व कौतुकास्पद कामगिरी बजावली.गेली अनेक वर्षे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या कार्यकलावधित त्यांनी अनेक सुधारणा व नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.तसेच ते राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी काम करत आहेत.या माध्यमातून विद्यार्थी हिताचे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवत आहेत.या यशाबद्दल श्री. संतोष तळवणेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जूनला कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

