आ.नितेश राणे यांच्या हस्ते भटक्या श्वानाचे निर्बिजिकरण व अँन्टी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ..

▪️कणकवली नगरपंचायत, सर्वेक्षप २०२१ व सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापुर यांचा संयुक्त उपक्रम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०४: शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेवुन शहरात मोहीम राबवली होती. मात्र दुदैवाने त्यामोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा शहरापुरता मर्यादित नसुन ग्रामीण भागात हि तेवढाच आहे. आपल्या संस्थेद्वारे  जिल्ह्यासाठी हा उपक्रम राबवुन आपण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठीचे सर्वोतोपरी मदत आपण करू अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कणकवली सर्वेक्षप २०२१ आणि सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापुर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानाचे निर्बिजिकरण व अँन्टी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर, विराज भोसले, कविता राणे, बंडु गांगण, महेश सावंत, न.प.कर्मचारी किशोर धुमाळे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल बेंबाटकर, संस्थेचे समन्वयक सचिन देवुडकर, मॅनेजर विजय पाटील, सदस्य आदी उपस्थित होते.

कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांने निल सावंत (९ वर्ष )  बालकाचा चावा घेतला होता. त्याचवेळी भटक्या कत्र्यांच्या  बंदोबस्त करण्याचा विडा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उचलला. अन् जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम सत्यात उतरवला. त्याची  सुरुवात आज सकाळ पासुन करण्यात आली. वर्कऑर्डर काढुन हे काम सोसायटी फॉर अँनिमल प्रॉटेक्शन या संस्थेने घेतले असुन, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्या टीमचे अभिनंदन  आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन केले.

या उपक्रमास आवश्यक असलेल्या सेंटरसाठी आमदार नीतेश राणे यांनी हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडच्या नजीक जागा उपलब्ध करून दिली आहे.

सचिन देऊलकर म्हणाले, आमच्या कामाची सुरुवात दररोज सकाळी ५.३० वा . पासुन सुरु होईल. यात कुत्र्यांना जाळ्यांचा तसेच आमच्या ‘स्किल’चा वापर करून पकडले जाईल. कुत्र्यांना ताब्यात घेतलेल्या ठिकाणी एक नंबर दिला जाईल व तोच नंबर कुत्र्याच्या कानावरही दिला जाईल. पुढे सेंटवर आणून लसीकरण वगैरे प्रक्रिया व नंतर नसबंदी केली जाईल. या सर्व प्रक्रिया तीन दिवसांमध्ये केल्या जातील. त्यानंतर या कुत्र्याला जेथुन ताब्यात घेतले, त्याच ठिकाणी आणुन सोडले जाईल. नसबंदी झाल्यामुळे नव्याने पिल्ले जन्माला येणे बंद होईल. तसेच विशेषत: श्रावण, भाद्रपद महिन्यामध्ये विशिष्ट कारणास्तव कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवरून धावण्याचे प्रकार दिसतात. या गोष्टी नसबंदीमुळे कमी होतील, या उपक्रमासाठी ११ जणांची टिम आहे. कुत्र्याला हाताळणे, गरजेनुसार औषधोपचार करणे, पुढे लसीकरण, नसबंदी आदींसाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.राहुल बेंबाटकर, विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही टिम कार्यरत असल्याचेही देऊलकर म्हणाले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!