आ.नितेश राणे यांच्या हस्ते नगरपंचायत मधील विविध प्रभागातील सात विकास कामांचा शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२९: येथील नगरपंचायत मधील विविध प्रभागातील सात विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक प्रभागात आमदार नितेश राणे यांचे शहरवासीयांनी जंगी स्वागत केले. येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अधिक्षक तथा निवडणूक प्रभारी जयेंद्र रावराणे यांनी आ. नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार नितेश राणे यांनी प्रत्येक प्रभागातील ग्रामस्थ, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांची विचारपूस केली. मतदार संघातील इतर प्रलंबित कामेही आपल्या माध्यमातून मार्गी लावण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. सुचविलेली सर्व कामे मार्गी लागतील असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी नागरिकांना दिले आहे.
विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, नगरपंचायत निवडणूक प्रभारी जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी सभापती सौ. स्नेहलता चोरगे, महिला आघाडी प्रमुख भारती रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, नगरसेवक सज्जनकाका रावराणे, महिला शहर अध्यक्ष विद्या पाटील, नगरसेवक संजय सावंत, रवींद्र तांबे, संताजी रावराणे, सुनील भोगले, दीपक गजोबार, शिवाजी राणे, संतोष कुडाळकर, राजू पवार, रत्नाकर कदम, विश्राम राणे, बबलू रावराणे, आदित्य चव्हाण व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शुभारंभ करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये प्रभाग क्र. १ मधील अर्जुन रावराणे विद्यालय याठिकाणी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच प्रभाग १ मधील मुख्य रस्ता ते गौरी घाट विसर्जन रस्ता नूतनीकरण करणे, मुख्य रस्ता ते डांगे यांच्या घराकडे जाणारा रस्ता नूतनीकरण करणे, प्रभाग ८ मधील रस्ता नूतनीकरण करणे, प्रभाग १२ मधील मुख्य रस्ता ते सज्जन काकांच्या घराकडे जाणारा रस्ता नूतनीकरण करणे, प्रभाग -१५ मधील मुख्य रस्ता ते सूर्यकांत सावंत यांच्या घराकडे जाणारा रस्ता नूतनीकरण करणे, प्रभाग १६ मधील मुख्य रस्ता ते मदा इंदप यांच्या घराकडे जाणारा रस्ता नूतनीकरण करणे. या विकास कामांचा शुभारंभ आज पार पडला.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_