कोकणच्या राजाला आंतरराष्ट्रीय सन्मान..
▪️दिग्दर्शक संतोष बांदेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०४: कोकणच्या दशावतारी राजाचा जीवनपट उलगडणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष बांदेकर यांचा दिग्दर्शित राजा लघुपट नाशिक शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला. काहूर द्वितीय तर प्राँन्स हा लघुपटाला तृतीय क्रमांक मिळाला. दुर्गाज लाकडा अन या लघुपटाला बेस्ट न्यूरी अवाँर्ड तर दरमजल व सुंदरी या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याच बरोबर राजा लघुपट चे शिरपेचात दुहेरी सन्मानाचा तुरा खोवला गेला असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राजा लघुपटाचे दिग्दर्शक संतोष बांदेकर यांना मिळाला आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट लेखन प्राँन्स स्वप्नील शेट्टये सर्वोत्कृष्ट संगीत बाईची जात, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण जया सर्वोत्कृष्ट संकलन सुंदरी याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष डॉक्टर सोमनाथ मुटकुळे राहत सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री चैताली जावकर सॅल्यूट तर सर्वोकृष्ट बालकलाकार म्हणून आर्येन पाटील चित्रकार यांना जाहीर करण्यात आले आहेत. या शॉर्टि फिल्म फेस्टिवलसाठी परीक्षक म्हणून श्याम शिंदे आणि किरण मोरे यांनी काम पाहिले फेस्टिवलचे आयोजन अतुल महानवर, योगेश गोसावी, अनिता पाटील यांनी अतिशय उत्तम रित्या आयोजन पार पडावे यासाठी मेहनत घेतली. राजा मध्ये किशोर वाळके, नंदू वाळके,बाळा परब, नारायण लाड, शंकर वाळके, किशोर सरनोबत, सुनील कदम, केतन गोठोस्कर दीपक वाळवे, दशावतारी कलाकार मामा तेजम आणि मध्यवर्ती भूमिका जिल्ह्यातील प्रथितयश अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी साकारली आहे. लेखक दिग्दर्शक संतोष बांदेकर तर संकलन छायाचित्रण आणि संगीत दया बाजू सागर बांदेकर आणि पुंडलिक सुद यांनी सांभाळले आहेत. या लघुपटाच्या निमित्ताने कोकणच्या लाल मातीतील उपजत कलाकार आणि रात्रीचे राजा असलेल्या दशावतारी कलाकारांची जागतिक स्तरावर परिणामकारक रिल्या मांडण्यात आले आहेत चित्रकरणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना स्थानिक उपलब्ध साधनांचा वापर करून गोठोस गाव आणि परिसरामध्ये राजाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं तेव्हा मोलमजुरी करणारे आणि हातावरच्या पोटावर जगणारे हे कलाकार या यशाने प्रचंड आनंदी झाले असून या यशाबद्दल दिग्दर्शक संतोष बांदेकर यांच्यासह राज्याच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_