कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

‘सेल्फी पॉईंट’ बनला ‘गप्पांचा कट्टा’

*🛑 ‘सेल्फी पॉईंट’ बनला ‘गप्पांचा कट्टा’*

*🛑 सावंतवाडी मोती तलावाकाठी दीड लाख रु. खर्चुनही काम अपूर्ण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८*:-सावंतवाडी नगर परिषदेने श्रीराम वाचन मंदिरसमोर मोती तलावाच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी आठ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी दीड लाख रुपये खर्च करण्यात आले. हे काम अपूर्ण असल्याने हा सेल्फी पॉईंट नागरिकांच्या बसण्याचा कट्टा बनला आहे.माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी हा सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता. परंतु, ते नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर हे काम अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेकडे पत्राद्वारे विचारणा करण्यात आली. परंतु पालिकेने या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट पूर्ण करण्यात कोण आडकाठी करतोय? असा सवाल केला जात आहे.दरम्यानच्या काळात प्रसिद्ध उद्योजक राजन आंगणे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या नावाने येथे कट्टा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या मित्रपरिवाराने केली होती. याबाबत पालिका आता काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी नागरिकांना आणि विशेषतः युवकांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात येतात. युवाईच्या दृष्टीने हे सेल्फी पॉईंट मोबाईलच्या जमान्यात आकर्षण ठरत आहेत. सावंतवाडी नगर परिषदेने संजू परब नगराध्यक्ष असताना मोती तलावाच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी पावले उचलली. त्यासाठी आठ लाख रुपये निधी मंजूर केला. सेल्फी पॉईंटवर सुमारे दीड लाख रुपये खर्चही करण्यात आला. त्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे बसविण्यात आले परंतु नंतरच्या काळात या सेल्फी पॉईंटचे काम थांबले. तीन वर्षे झाली, तरी या सेल्फी पॉईंटचे काम ठप्प आहे. काही दिवसांत होणारे काम तीन वर्षे होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता हा सेल्फी पॉईंट बसण्याचा कट्टा बनला आहे. नागरिक येथे सायंकाळी बसून गप्पागोष्टी करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात. त्यामुळे या ठिकाणी आता एक तर सेल्फी पॉईंट उभारावा अन्यथा बसण्यासाठी सुसज्ज कट्टा बनवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.हा सेल्फी पॉईंट मोती तलावाच्या काठावर आकर्षण ठरणार होता परंतु सेल्फी पॉईंटमुळे तलावाचे दर्शन होण्यात अडसर असल्यामुळे या सेल्फी पॉईंटचे काम थांबले असल्याचे सांगण्यात आले आहे. सावंतवाडी पालिकेने मोती तलावाच्या काठावर उभारलेला सेल्फी पॉईंट अर्धवट स्थितीतच आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!