नेमळे हायस्कूलच्या१९९७-९८च्या बॅचचा गुरुजन कृतज्ञता सोहळा व पुनर्मिलन कार्यक्रम संपन्न
*🛑नेमळे हायस्कूलच्या१९९७-९८च्या बॅचचा गुरुजन कृतज्ञता सोहळा व पुनर्मिलन कार्यक्रम संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-नेमळे हायस्कूलच्या सन १९९७-९८ सालातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुरुजन कृतज्ञता सोहळा पुनर्मिलन कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल २६ वर्षानंतर विद्यालयात परस्पर भेटताना सर्वांना आनंदाने भरून आले. या बॅचच्या आपल्या सर्व शिक्षकांना फेटा बांधून ,त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत सनईच्या सुमधुर सुरात स्वागत केले. शाळेची घंटा वाजली व शाळा भरली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.आपल्या दिवंगत शिक्षक, माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन करताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजनाचे फार कौतुक केले. त्यानंतर स्नेहभोजन होऊन गप्पा टप्पा रंगल्या. कार्यक्रमाला जमलेल्या आर्थिक मदतीतून शाळेला वस्तू स्वरूपात देणगी देण्याचे ठरले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली. शाळेत प्रथमच एक कल्पक व नाविन्यपूर्ण उपक्रम या बॅचने राबवला. या उपक्रमाची दखल इतर बॅचचे विद्यार्थी घेतील आणि असेच कार्यक्रम या विद्यालयात होतील व माजी विद्यार्थी शाळेकडे वळतील असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री. आ. भि. राऊळ यांनी मांडले.या कार्यक्रमाला नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तेंडोलकर मुख्याध्यापक कल्पना बोवलेकर, माजी मुख्याध्यापक दीपक साधले,रेश्मा भाईडकर ,साधना तेंडोलकर किरण वेटे,माजी शिक्षक श्रद्धा नाईक, विकास गोवेकर,संजय पिळणकर,तर गावकर,लक्ष्मण सावंत, नयन गावडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महादेव राऊळ, विद्यमान शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन या बॅचचे विद्यार्थी, विद्यालयाचे प्राध्यापक पांडुरंग दळवी यांनी केले. प्रास्ताविक उज्वला गावडे तर आभार सुवर्णा सावंत हिने मांडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न हर्षलता नाईक हिने केले. सुवर्णा नाईक, हनुमंत धोत्रे, नाझिया खान,महेश कानसे ,मधुसूदन पाटकर, शिवराम होडावडेकर, हरी विटेकर, ज्ञानदेव मांजरेकर, संजय तुळसकर तसेच दहावी सन १९९७/९८ चे सर्व विद्यार्थ्यांथी तसेच राजेश गुडेकर , उमेश राऊळ सुषमा कासार, दिलीप मेस्त्री, राजन घोगळे,सायली भैरे, प्रथमेश करंगुटकर सहकार्य केले.कार्यक्रम यादगार ठरल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

