क्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली चेक पोस्ट येथे दारू वाहतूक करताना दोघांना अटक..

▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या उठावाने पोलीस यंत्रणा सतर्क..

▪️पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलिसांची यशस्वी कारवाई..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि.०४: येथे काल गोव्यावरून सोलापूर येथे दारू वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी  गाडी क्रमांक एम एच ४५ एडी ६२७६ दानोली येथील पोलिसांना चकवा देत पाळण्याचा प्रयत्न केला. दानोली येथील बंदोबस्तावरील पोलिसांनी पाठलाग करताना आंबोली पोलिसांना याची कल्पना दिली. आंबोली येथे पोलिसांचा बंदोबस्त पाहून संशयितांनी चौकुळच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंबोली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्ता देसाई यांनी दुचाकी घेऊन या गाडीचा सुमारे पाच ते सहा किलोमीटर पाठलाग करत गाडी अडवली. गाडीची झाडाझडती घेतली असता पाठीमागे दारूचे बॉक्स आढळून आले. त्यानंतर संशयितांना जेरबंद करत आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी गाडी व दारू सह एकूण ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण महावीर बोराडे वय वर्ष २५ व सज्जन बब्रुवान बोराडे वय वर्ष ४५ राहणार बैरागवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईत आंबोली पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, पोलीस नाईक संदीप गावडे, दीपक शिंदे, दानोली येथील बंदोबस्तावरील पोलिस महेंद्र बांदेकर, विलास नर, आबा पिळणकर यांनी फार मोठी कामगिरी बजावली.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!