बेकायदा दारु वाहतुकी विरोधात आंबोली पोलीसांची कारवाई..
▪️एकूण ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव
🎴आ़ंबोली,दि.२६: गोव्यातून सांगलीच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात आंबोली पोलीसांनी कारवाई करीत ५४ हजारांच्या दारुसह ३ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आंबोली मुख्य धबधब्याजवळ बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
बेकायदा दारु वाहरुक प्रकरणी प्रकाश बळीराम चव्हाण (२६) व अनिल विलास सोलनकर (२३, दोघेही रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ५४ हजार रुपयांच्या दारुसह ३ लाख रुपयांची स्विफ्ट कार (एमएच ४२ के २२०३) असा एकूण ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
आंबोली घाटात काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान आंबोलीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार तपासणीसाठी थांबविण्यात आली. कारची तपासणी केली असता डिकीत मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या आढळून आल्या. यात इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ४८ बाटल्या (किंमत २४ हजार रुपये), मॅकडोवेल व्हिस्की नं. १ च्या ४८ बाटल्या (किंमत २४ हजार रुपये) व मॅकडोवेल नं. १ थ्री एक्स रमच्या ४८ बाटल्या (६ हजार रुपये) असा एकूण ५४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची कार ताब्यात घेण्यात आली.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार ए. एन. तेली, पोलिस हवालदार दत्ता देसाई, पोलीस नाईक दिपक शिंदे, पोलीस शिपाई अभिजित कांबळे, राजेश नाईक, संदिप गावडे, होमगार्ड महेंद्र परब यांच्या पथकाने केली.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

