नापणे धबधबा स्वच्छता व वनभोजन कार्यक्रम संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०४: ३ जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. तसेच यावर्षी पासून महिला शिक्षण दिन (पहिला) म्हणून साजरा करण्यात आला.

या “पहिल्या महिला शिक्षण दिना” च्या निमित्ताने वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने वैभववाडी तालुक्याचे वैभव असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे बारमाही वाहणारा नापणे धबधबा परिसर स्वच्छता कार्यक्रम राबवून पहिला महिला शिक्षण दिन साजरा केला.

या नापणे धबधब्याला अनेक पर्यटक भेटी देतात. धबधब्याच्या वरील बाजूला अनेक पर्यटक कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेत असताना काही पर्यटक बेशिस्तपणे वागत पाणी व थंड पेयाच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या टाकून परिसर अस्वच्छ करतात. धबधबा व येथील पर्यटकांवर कोणाचेच नियंत्रण नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी या दिनाच्या निमित्ताने स्वच्छता कार्यक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः जेवण तयार करुन वनभोजनाचा आस्वाद घेतला.

या स्वच्छता कार्यक्रमात इतिहास विभागातील सुरज पाटील, दीपक पावसकर, सागर तांबे, क्षितिज वाडेकर, प्रमोद वारीक, श्रुती धनावडे, आकांक्षा इंदुलकर, माधुरी पालकर व प्रणाली साळुंखे हे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी व शिक्षक श्री.संदेश तुळसणकर सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख व माऊंटेनिअरिंग संस्थेचे सचिव प्रा.श्री.एस एन.पाटील यांनी केले होते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे व संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

