आपत्कालीनकणकवलीकोकण

कणकवलीत ३ दुकानांना लागली आग

कणकवली | प्रतिनिधी
कणकवली बाजारपेठेत पहाटे ३ वाजताच्या सुमारास दुकानांना आग लागली. कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले. त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी झाले. तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही आगीची झळ पोहचली आहे .कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पहाटे ५.३० पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
कणकवली झेंडा चौक येथील ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडले.या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणत धुराचे व आगीचे लोट येवू लागले. या दरम्यान शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यानी तात्काळ आरडाओरडा केला.तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला विळखा घालत ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली.त्याचप्रमाने अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट सुरु झाले होते.
ही माहिती मिळाल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने न.प.चा अग्नी शामक बंब बोलविला. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.त्याच प्रमाणे दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आग फैलावु नये म्हणून प्रयत्न करण्यात आले.मात्र आग आटोक्यात येत नव्हती भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरु झाल्याने आकाशात धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,भाई साटम,प्रसाद अंधारी, अमित सापळे,नाना सापळे,प्रद्युम मुंज,बापू पारकर,हर्षल अंधारी,आदित्य सापळे, आशिष वालावलकर आदी तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी मदत कार्य केले.अद्याप ही आग आटोक्यात येत नसून या आगीत दुकान मालक आबा उचले,राजेंद्र बाजाजी,नाथा अंधारी यांचे लाखों रुपयेचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आनण्यासाठी बली न.प.बरोबर मालवण,सावंतवाडी येथील अग्निशामक बंब दाखल झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!