ब्रेकिंग न्यूज;कणकवलीत बस पलटी होऊन अपघात

 

दोन प्रवासी झाले ठार तर काही प्रवासी गंभीर जखमी

प्रतिनिधी:-प्रथमेश जाधव

कणकवली शहरा लगत असणाऱ्या हळवल फाट्यावर आज पहाटे ५:३० वा च्या सुमारास मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी (ए आर १६ ए ७२७७) पलटी होऊन यातील दोन प्रवासी ठार झाले आहेत . तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुमारे ४० प्रवासी या गाडीतून प्रवास करत असल्याचे समजते. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच हलकल्लोळ झाला. हळवल फाट्यावरील अवघड वळणावर ही लक्झरी पलटी झाली. वारंवार हे वळण धोकादायक बनत चालले असून अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत.
अपघाताची माहिती मिळतात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, किरण कदम, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, वृषाली बरगे, श्री. पार्सेकर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी घेतली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे धोकादायक वळण वारंवार अपघातास निमंत्रण देत असून महामार्ग चौपदरीकरण कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कामामुळे या अपघातग्रस्त वळणावर सातत्याने गेले काही वर्षे अपघात सुरू आहेत. एवढे अपघात होऊन देखील ठेकेदार कंपनीचे डोळे केव्हा उघडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!