▪️मला विचारल्या शिवाय कोणाचीही विज खंडित करू नये …
▪️पालकमंत्री उदय सामंत यांचे महावितरणला आदेश;व्यापारी महासंघाची यशस्वी शिष्टाई.
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :गणेश तोडकर*
*🎴कुडाळ:* सिंधुदुर्गातल्या एकाही विज ग्राहकाचा विज पुरवठा मला सांगितल्या शिवाय खंडीत करायचा नाही आणि कोरोना टाळेबंदी मुळे आधिच अडचणीत आलेल्या व्यापारी वर्गाने विज बिल भरण्या बाबत दिलेल्या प्रस्तावा नुसार सर्वांना हप्ते बांधून द्या असे सुस्पष्ट निर्देश काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी महावितरणला दिले.यामुळे गेल्या काही दिवसा पासून विज कंपनीने थकबाकीदार ग्राहकांचा विजपुरवठा खंडीत करण्याच्या सुरू केलेल्या टोकाच्या कारवाईला पायबंद बसून कोरोना मुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक विज ग्राहकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.
*जिल्हा व्यापारी महासंघाची शिष्टाई यशस्वी.*
या बाबत सविस्तर वृत्तांत असा,कि कोरोना टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी विज देयके आपणास मान्य नाहीत,कोरोना काळात लागू करण्यात आलेली विज दरवाढ परत घ्या,कोरोना काळातील वापरलेल्या विजेच्या रकमे व्यतिरिक्त अन्य सर्व कर,आकार व व्याज माफ करा,कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यातील विज देयके ही विवादीत बाब म्हणून कल्पून ॲाक्टोबर पासूनची देयके स्विकारा,टाळेबंदीच्या काळातील विज देयके भरण्यासाठी हप्ते बांधून द्या आदी मागण्यांसाठी व्यापारी महासंघाने शासन,प्रशासन व कंपनी कडे अर्ज व निवेदने सादर केली होती.त्या बाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास १मार्च नंतर संवैधानिक मार्गानी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.दरम्यान विज कंपनीने थकबाकीदारांचा विजपुरवठा खंडीत करण्याची टोकाची कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्य विज ग्राहकांत अस्वस्थता पसरू लागली होती.
या पार्श्वभुमिवर आज जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांची भेट महासंघाने मागितली होती.नाम.सामंत यांनीही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाह श्री.निलेश धडाम,श्री.द्वारकानाथ घुर्ये,अशोक गाड,संजय भोगटे,राजन नाईक,
कुडाळ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट,गोविंद सावंत
नितीश म्हाडेश्वर,भूषण मठकर,प्रसाद शिरसाट,शार्दूल घुर्ये,अनिकेत नेवाळकर,जिल्हा डिस्ट्रीब्यूटर्स असो.चे विवेक नेवाळकर आदींचा सदस्यांसह महासंघाच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे पालकमंत्र्याची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले.नाम.उदय सांमत यांनीही व्यापाऱ्यांच्या रास्त मागण्यां बाबत ठोस निर्णय घेण्याची तयारी दर्शवित भ्रमणध्वनी वरून विजवितरणच्या अधिकाऱ्यांना कोणाचाही विज पुरवठा खंडीत न करण्याचे आणि थकीत रकमे बाबत हप्ते बांधून देण्याचे आदेश दिले.
*महासंघा कडून आभार-*
पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी संवेदनशीलता दाखवित तातंडीने सुयोग्य आदेश निर्गमित केल्या बद्दल महासंघाचे अध्यक्षांनी मंत्रीमहोदयांना धन्यवाद देत विशेष आभार मानले आहेत.
*आज घेणार महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट-*
दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशा नुसार थकीत विज बिलाच्या प्रश्नी हप्ते बांधून घेणे व अन्य बाबीं बाबत जिल्हास्तरावर एकच सुनियोजित धोरण आखून घेण्यासाठी महासंघा मार्फत महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही श्री.तायशेटे यांनी दिली.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_