कोकणराजकीय

माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्यासारखे लोकप्रतिनिधी नगरपालिकेत असणे काळाची गरज..

🛑सर्वसामान्यांना बबनराव हवे आहेत पुन्हा नगरपालिकेत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ विशेष वृत्त-कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-२७नोव्हेंबर* नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला अतोनात गरज असल्याचे सर्वसामान्य जनतेला भासत आहे अशी चर्चा शहरात सुरु आहे.बबन साळगांवकर असतानाची सावंतवाडी नगरपालिका आणि आता सत्तांतर झाल्यानंतर असलेली नगरपालिका या मध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे हे शाळेतील लहान मुलगा सुध्दा सांगू शकतो.. बबन साळगांवकर यांची काम करण्याची पद्धत अतिशय सुंदर होती आणि अजूनही आहे.गेली अनेक वर्षे ते नगरपालिकेचे प्रशासन सांभाळत होते, मात्र कधीच जनतेला त्रास होईल किंवा सावंतवाडी शहरात वादविवाद होतील असे प्रकार घडले नाहीत..राजकारण करत असताना चढउतार येत असतात अशाच काही चढ उतारांना बबन साळगांवकर यांना तोंड द्यावे लागले काही दिवस बबन साळगांवकर पुर्णपणे राजकारणापासून अलिप्त होते..मात्र बबन साळगांवकर यांच्या कार्याचा आढावा घेतला तर नक्कीच बबन साळगांवकर ह्या व्यक्तीसारखे लोकप्रतिनिधी नगरपालिकेत आसने किती गरजेचे आहे हे स्पष्ट होते. बबन साळगांवकर ह्यांनी कधीच विकास कामात राजकारण केले नाही खरोखर पक्षाची चप्पल बाहेर काढून ते नगराध्यक्ष कक्षात बसून कार्य करत राहीले.अनेक लोकप्रतिनिधींनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष पद भुषविले आहे त्यामध्ये बबन साळगांवकर यांच्यासारखे पुन्हा नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे.आपली सावंतवाडी सुंदर सुसंस्कृत आहे मात्र हल्लीच्या काळात काही गोष्टींमुळे सावंतवाडीचे नाव बरेच चर्चेत राहीले आहे.बबन साळगांवकर यांनी नगरपालिकेत आपल्या कार्यकर्त्यांना, मित्रमंडळी,पक्षाचे पदाधिकारी ह्यांना घेऊन आपले हक्काचे घर असल्यासारखे वागले नाही,तर कधी पक्षाच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदासुद्धा सभागृहात घेतल्या नाही. एक साधे राहणीमान,प्रामाणिक कार्य अशी बबन साळगांवकर यांची ओळख अजूनही आपल्या सावंतवाडीत आहे.
गेली अनेक वर्षे बबन साळगांवकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून काम करत होते, त्याकाळात सर्वाना विश्वासात घेऊन काम केले व्यापारी असतील,स्थानिक नागरिक असतील सर्वाना एकत्रित करुन काम केले कधीच त्यांनी स्थानिकांना त्रास होईल गावातून येणाऱ्या छोट्या छोट्या भाजीविक्रेत्यांना त्रास होईल असे वागले नाही. काही नगरसेवक असतील ते तर स्थानिकांच्या पोटावर पाय देऊन स्वतःच्या स्वार्थापोटी परप्रांतीयांना व्यापारासाठी मदत करत आहे असे प्रकार सुद्धा सावंतवाडीत घडले हे सर्वसामान्य लोक जाणून आहेत. मात्र बबन साळगांवकर नगराध्यक्ष असताना विरोधी नगरसेवक असो किंवा सत्ताधारी नगरसेवक ह्यांना कधीच हुकुमशाही गाजवायला दिली नाही.
सावंतवाडीला पुन्हा एकदा बबन साळगांवकर ह्यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे,अशी प्रतिक्रिया सावंतवाडीकरच्या मुखातून व्यक्त होत आहे..
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!