जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते कसाल येथील श्री अनंत स्मृती चँरिटेबल विद्यानिकेतन स्कूलच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.३१: मी प्रशासनातील एक अधिकारी असून प्रशासनाच्यावतीने या ट्रस्टचे आभार व कौतुक करत आहे करत आहे. तुम्ही शिक्षणाची घडी बसवून विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहात. आपण प्रत्येक वेळी शासनाच्या उपक्रम राबवितो. मात्र तुम्ही फक्त विद्यार्थी घडवित आहात तुमच्या संस्थेमुळे शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे. बीएससी नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आय ए एस अधिकारी तयार व्हावेत एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास कराव्यात असे प्रतिपादन कसाल येथील श्री अनंत स्मृति ट्रस्टच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना केले .
श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या इमारतीचे भूमिपूजन सोहळा आज जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद ( भाई ) सावंत सचिव यशवंत परब अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक चिराग बांदेकर ,कसाल सरपंच संगीता परब उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल मंडळाधिकारी मंगेश हांगे, नवीन बांदेकर अवधूत मालवणकर तरुण भारत जिल्हा आवृत्ती प्रमुख शेखर सामंत शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .
शेखर सामंत म्हणाले या संस्थेचे युवक शैक्षणिक क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम करत आहेत मी त्यांना भरपूर वर्षापासून ओळखत आहे त्यांनी एकत्र येत गावराई सारख्या ग्रामीण भागात नर्सिंग स्कूल चालू केले आहे. त्यांची मोठी वाटचाल आहे. महाराष्ट्रात या नर्सिंग स्कूलचे चांगले नाव लौकिक झाले आहे. बीएस्सी नर्सिंग चे चांगले विद्यार्थी घडवून चांगल्या मुंबई ,पुणे, कोल्हापूर, सारख्या शहरांमध्ये नोकरी जॉब करून कुटुंबही सांभाळत आहेत .विद्यानिकेतन च्या माध्यमातून चांगले संस्कार या विद्यार्थ्यांवर घडत आहेत स्वतः च्या मालकीची जमीन आता मिळाली आहे. या संस्थेला ज्यांनी शिक्षणासाठी जमीन दिली त्यांचेही आभार मानत आहे .सामंत म्हणाले फक्त पुस्तकी ज्ञान न घेता बाहेरील जगातील ज्ञान आत्मसात विद्यार्थ्यांनी करावे. हेही महत्त्वाचे आहे तसेच नवीन वर्षात चांगलं काम शिक्षण घडविण्यासाठी सुरु करत असल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देत चांगले घडवूया असे शेखर सामंत म्हणाले.
जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी म्हणाल्या गरिब कुटुंबातील आलेले विद्यार्थी आता शिक्षणाघेण्यासाठी पुढे येत आहेत .सध्या शिक्षणच महत्त्वाचे आहे जिल्ह्यात दहावीपर्यंत चांगले विद्यार्थी घडले आहेत मात्र बारावी नंतर एमपीएससी यूपीएससी असे शिक्षण घेत आयएसआय अधिकारी व्हा तसेच बीएससी नर्सिंग झालेले विद्यार्थी सुद्धा आयएसआय अधिकारी तयार होऊ शकतात शाळेतून जरी मुलांना शिक्षण देत असला तरी जनरल नॉलेज ची माहितीही द्यावी तसेच पालकांची पण जबाबदारी मुलांना घडविण्यासाठी आहे त्यांना चांंगले मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील सर्वच नर्सिंग कॉलेज च्या मुलां,मुलीनी कोविड प्रादुर्भावाच्या साथिचा काळात भरपूर मेहनत, कष्ट ,घेऊन सर्व रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे. नर्सिंग कॉलेजचे शिक्षण घेऊन संस्थेने चांगली मुले घडवावीत.असे हीप्रतिपादन उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कसाल येथे केले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_