सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार; परिवहन मंत्री अनिल परब

▪️परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कुडाळ येथील नुतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.३०: प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एस.टी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

कुडाळ येथील नुतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाईन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गट विकास अधिकारी मोहन भोई, जि.प. सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एस.टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, डेपो मॅनेजर सुजित डोंगरे, महेश सावंत, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडाळ बसस्थानक १९७१ पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकापैकी एक असे हे बस स्थानक आहे. बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण करण्यात यश आले आहे. असे सांगून परिवहन मंत्री अनिल परब पुढे म्हणाले, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरीत कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. कोरोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण झाले नव्हते ते आज माझ्या हस्ते झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली यांचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरामध्ये अद्ययावत बसस्थानक ही या शहराची अत्यंत गरज होती. सुमारे १ कोटी ४० लाख रुपये खर्च करुन हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. या नविन बसस्थानकामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. नविन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौदर्यांतही भर पडली आहे. कुडाळ स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग एस.टी विभाग नियंत्रण प्रकाश रसाळ, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, अमित सावंत यांची समयोचीत भाषणे झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. परिवहन मंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रत्यक्ष आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एस.टी.महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!