माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचा आज लोकार्पण सोहळा..
▪️कर्तुत्वन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कार्यकाळात दूरदृष्टी ठेवून मंजूर केली होती कामे..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.३०: शहराचे कर्तुत्वान माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कालावधीत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, काळजी शहाबुद्दिन हाॅल, बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण तसेच जगन्नाथराव भोसले उद्यान व संरक्षक भिंत या कामाची निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली व नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागून त्यात संजू परब विजयी झाले होते. या सर्व कामांना नगराध्यक्ष संजू परब यांनी चालना देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेतली व काही कामे रखडलेली होती, ती पूर्णत्वास नेली. मात्र, दूरदृष्टी ठेवून ही कामे मंजूर केलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आता या प्रक्रियेपासून फार दूर राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेली कामे, केलेला पाठपुरावा याची साधी दखलही घेतली गेली नाही. याबद्दल सावंतवाडीत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपल्या कारकीर्दीत सावंतवाडीच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीत राजकारण करायचे नाही असे स्पष्ट केले.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

