शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र देवळी यांचा तडकाफडकी राजीनामा; तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या बालेकिल्ल्यात खळबळ
▪️आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर माळगवात राजकीय वातावरण चांगलेच तापणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.३०: शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरल्याने मळगाव येथील शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र देवळी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मळगाव परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मळगाव परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युजच्या हाती लागलेल्या श्री. देवळी यांच्या राजीनामा पत्रात असे म्हटले आहे की, मी रामचंद्र सदाशिव देवळी, रा. मळगाव, सावंतवाडी. गेली सहा वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत आहे. गाव हाच माझ्यासाठी पक्ष असे समजून सामाजिक कार्य करत होतो. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्यावर विश्वास ठेवून गावच्या विकासासाठी मी माझ्या मित्रमंडळींसमवेत शिवसेना खासदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या समक्ष शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु मला खेदाने असे सांगावे वाटते की, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही घोडचूक केली. दिलेली आश्वासने खोटी ठरली. यापुढे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून गावासाठी कार्यरत राहणार आहे. पक्षात कुवत नसलेल्यांच्या हातात जबाबदारी आणि आमच्या हातात करवंटी अशी पद्धत असल्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना दिलेल्या राजीनामा पत्रात श्री. रामचंद्र देवळी यांनी म्हटले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

