वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.३०: तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी एकूण १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले. तर आतापर्यंत १५६ अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे मंगळवारी उमेदवार व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिल परिसरात मोठी गर्दी केली केली होती. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु होती. महा ई सेवा केंद्र व सेतु सुविधा केंद्र, संगणक सेंटर बाहेर दिवसभर गर्दी दिसत होती.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. परंतु २७ डिसेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. २८ डिसेंबर ५ ग्रामपंचायतीतून २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सांगुळवाडी १, कोकिसरे ३, नाधवडे २, एडगाव ७, तर आचिर्णेतून १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर मंगळवारी १३ ग्रामपंचायतीतून १२६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सांगुळवाडी ९,कोकिसरे २६,खांबाळे ११, लोरे १२, नाधवडे १२, कुंभवडे १, एडगाव १७, मांगवली ६  भुईबावडा ६, सोनाळी १४, वेंगसर ७, ऐनारी ११, तर आचिर्णे १८ असे एकूण १२६ अर्ज दाखल झाले आहेत.

दोन दिवसात सर्वाधिक कोकिसरे ग्रामपंचायतीसाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर आचिर्णे ग्रामपंचायतीसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत. तर कुंभवडे ग्रामपंचायतीसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!