जुना रेल्वे स्टेशन फाटक ते शिरोडा-सावंतवाडी जोड रस्ता धोकादायक; युवासेनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन
▪️येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा युवासेनेचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०५: जुना रेल्वे स्टेशन फाटक ते शिरोडा-सावंतवाडी हा जोड रस्ता अतिशय धोकादायक झाला असून या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे साचलेल्या पाण्यामुळे चिखलमय झाला आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर यावर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा येत्या आठ दिवसात युवासेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज निवेदनाद्वारे युवासेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांना दिला.
युवासेना उपजिल्हा अधिकारी सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना उपतालुका अधिकारी विनायक सावंत, युवासेना सावंतवाडी उपतालुका अधिकारी आदित्य आरेकर, आंबोली युवासेना उपविभाग अधिकारी मायकल डिसोझा, विशाल बांदेकर आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान तत्पूर्वी या मार्गाची युवासेना उपजिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी घटनास्थळी जात या रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे जुना रेल्वे फाटक ते महामार्ग दरम्यान पडत असलेली मायनिंग मातीमुळे हा मार्ग खड्डेमय झाला असून त्यातच ही माती पावसाच्या पाण्यामुळे सावंतवाडी शिरोडा मार्गावरील रस्त्यावर येऊन पूर्णता चिखल झाला आहे. यामुळे शिरोडयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना उजव्या बाजूला वाहन चालवावे लागत आहे. यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चिखलातून वाहन हाकण्यात दुचाकी स्लीप होऊन पडण्याची ही भीती निर्माण झाली आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची शिष्टमंडळात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी वस्तुस्थिती मांडली. ही समस्या न सोडविल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. असे यावेळी सांगितले. यासोबतच त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अपघाताची संख्या टाळण्यासाठी नवीन साईड पट्टी मारण्याची मागणी यावेळी केली. ज्या रस्त्यावर गतिरोधक असून त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली जाते विचार करून लवकरात लवकर पांढरे पट्टे माराव्यात अशी मागणी यावेळी केली यासोबतच ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर दिशा दर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी असे यावेळी कार्यकारी अभियंता यांना सांगितले या सर्व मागण्यांचा विचार करून आठ दिवसाच्या आत कार्यवाही सुरुवात करावी अन्यथा युवासेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_