भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता सावंत तर उपसरंपचपदी नितिन सावंत यांची बिनविरोध निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.११: भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता सावंत आणि उपसरंपचपदी नितिन सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी शिवसेना पक्षावतीने उमेदवारी जाहीर केली होती. आज सकाळी दोन्ही पदासाठी उमेदवारी नामर्निदेशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राऊत यांना सादर करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता विषेश सभेत सरपंच आणि उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.आज सकाळी भिरवंडे येथील ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी सतीश सावंत यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य मंगेश सावंत, हेमंत सावंत, देवालय संचालक मंडळाचे सचिव गणपत सावंत,कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सरचिटनिस सुरेश सावंत, भिरवंडेकर मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष अजित सावंत, माजी सरपंच महादेव सावंत, भिरवंडे सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, विनय सावंत, संदिप सावंत आदी मान्यवर उपस्थितीत होते. भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा बिनविरोध होत्या तर तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. सुजाता सावंत या दुसर्‍यांदा सदस्य निवडून आल्या होत्या. दोन्ही वेळा त्या बिनविरोध निवडून आल्या. यंदा सरपंच आरक्षण ओबीसी महीला राखीव झाल्याने त्यांना संधी मिळाली. तसेच नितिन सावंत हे गेल्या दहा वर्षापुर्वी या गावचे सरपंच होते. तसेत नितिन सावंत हे कणकवली तालुका पत्रकार संघाचे विद्यमान सचिव, कनेडी शिक्षण संस्थेचे शालेय समिती सदस्य आहेत. ग्रामिण विकासाचा त्यांचा चांगला अनुभव आहे. आज झालेल्या निवडीनंतर सर्व पदाधिकारी आणि सदस्याने गावच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!