शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप कडून तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते स्वागत नाटेकर नाराज..

▪️’इन्सुली’त विकास करायचा असल्याने अपक्ष निवडून येणारच; नाटेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.०५: इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप कडून तिकीट मिळाले नसल्याने भाजपचे कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.‌ सत्य आणि ‌तथ्य सांगत असल्यामुळेच जाणुनबुजून डावलले ‌गेल्याचा आरोप श्री. नाटेकर यांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनातील गैर कारभाराविरुद्ध नेहमी आवाज उठवणाऱ्याचा भविष्यात त्रास नको म्हणुनच आपल्याला डावलले असा नाराजीचा सूर श्री. नाटेकर यांनी लावला आहे. प्रशासन आणि सदस्य यांच्या संगनमताने करण्यात येणाऱ्या भ्रष्ट प्रकारांना आळा बसेल याची भीती आणि त्यामुळे उत्पादन साधन बंद होण्याच्या शक्यतांमुळे तसेच आपल्या माळेत न बसणाऱ्या माणसाला संधी न देता आपणच आपला मनमानी कारभार चालवू या आशेने तथाकथित वरिष्ठ नेते राजकारण करत आहेत. असे मत श्री. नाटेकर यांनी व्यक्त केले आहे.

ग्रामविकासची दृष्टी असणाऱ्या व्यक्तीला स्वार्थी राजकारण करणाऱ्या गावातील काही तथाकथित  राजकारण्यांकडून जाणूनबुझुन पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यापासून रोखण्यात आले आहे. सत्य आणि तथ्य सांगणारे आणि ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभार नेहमीच जनतेच्या समोर उघड करणाऱ्या गावातील प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या श्री. स्वागत नाटेकर यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. मागच्या वर्षांपासून स्वतःच सरपंच होणार असे गावात डांगोरा पिटणारे आणि गावाचे वैभव असणारी ग्रामपंचायतची इमारत सुद्धा व्यवस्थित उभारू न शकणारे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात विकासावर भाष्य करणार आहेत. मागील ३० वर्षांपासून सत्तास्थानी असून सुद्धा किरकोळ रस्ते करणारे पुन्हा एकदा आपले कुटुंबातील सदस्यांला संधी मिळून देण्यासाठी धडपडत आहेत. आज जरी मला उमेदवारी दिली नसली तरी देव-देश आणि धर्म यासाठी कटीबद्ध असलेल्या आणि संपुर्ण जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्य करून सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता अशा गलिच्छ पद्धतीला हद्दपार करून गाव आणि शेतकरी, कष्टकरी जनतेला विकासाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भविष्यात प्रामाणिकपणे आणि निष्टेने करणार असल्याचे श्री. स्वागत नाटेकर यांनी सांगितले.

आपल्याला इन्सुली गावात जनमत आहे आणि आपण नेहमीच सामाजिक कार्यात हातभार लावला. हे गावातील सर्व जनता जाणते. आपणाला इन्सुली गावाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आपण रिंगणात उतरुन अपक्ष फॉर्म भरला आहे. आपल्या प्रभागातील मतदार सुशिक्षित आहेत. त्यामुळे आपणाला ‌चांगल्या‌‌ प्रकारे मतदान होईल आणि आपण निवडून येणारच अशी ‌अपेक्षा श्री. स्वागत नाटेकर यांनी व्यक्त केली आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!