अज्ञात वाहनाच्या धडकेत ठेकेदार राजू राणे गंभीर..

▪️अधिक उपचारासाठी गोव-व्हिजन रुग्णालयात हलविले..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२९: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठेकेदार राजू राणे गंभीर जखमी झाले  आहेत. हा अपघात आज सायंकाळी ३:३० वाजण्याच्या सुमारास माडखोल-धवडकी येथे घडला.

श्री दत्त जयंती उत्सवाला माडखोल धवडकी येथील श्री दत्त महाराज यांना नमस्कार करून बाहेर पडले असता समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या अंगणातील तुळशी वृंदावनावर  फेकले गेले व त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील व्हिजन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी राजू राणे हे अर्धवट असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या श्री दत्त मंदिरात जाऊन श्री दत्त माऊलींना नमस्कार करून बाहेर पडले होते व ते आपल्याकडे ज्या ठिकाणी चालत जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते उडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या तुळशी वृंदावनावावर जाऊन आदळले. यात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, संबंधित वाहनचालकाने त्या ठिकाणाहून वाहनासह पलायन केले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!