कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबा बाजारासाठी पालिकेकडून जागेचा शोध

*🛑आंबा बाजारासाठी पालिकेकडून जागेचा शोध*

*🛑संत गाडगेबाबा मंडईचे काम सुरू असल्याने आंबा विक्रेत्यांची गैरसोय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८*:-कोकणचा राजा हापूस आंबा सावंतवाडी बाजारपेठेत दाखल झाला आहे. हापूस आंब्याचा दर डझनामागे ८०० ते १२०० एवढा दर्जानुसार आहे. देवगड हापूस आंबा १२०० रुपये तर नेमळे, वेंगुर्ले येथील हापूस आंब्याचा दर ७०० ते ८०० रुपये डझनमागे आहे. यंदा आंब्याचे पीक कमी असल्याने दर वाढणार आहेत. मार्च महिना संपत आला असून एप्रिल व मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात सावंतवाडी बाजारपेठेत आंब्याचा बाजार भरतो. मात्र, यंदा सावंतवाडीत संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने आंबा बाजार कोठे भरवायचा, या विवंचनेत पालिका प्रशासन आहे. सध्या किरकोळ व्यापारी हे नगरपालिकेच्या समोरच्या जागेत औदुंबर झाडाजवळ बसत आहेत. येथेच दरवर्षी आंबा बाजार भरतो. मात्र, यंदा हा आंबा बाजार त्याच ठिकाणी भरवायचा का, या संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, तेथे आंबा बाजार भरल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालिका प्रशासन आंबा बाजार कोठे भरवावा, या विवंचनेत आहे. आंबा विक्रेत्यांनी सहा आसनी रिक्षा व टेम्पो वाहतूक तळावर बाजार भरवावा, अशी विनंती पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्या दृष्टीनेही प्रशासन विचार करत आहे. हापूसचा दर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उतरेल, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. हापूस आंबा यंदा कमी आहे. कोकणातील गावठी आंबे सध्या दिसत नाहीत. कैरीदेखील दहा ते पंधरा रुपये दराने विक्री केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!