कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबोलीत आज शिवजन्मोत्सव सोहळा

*🛑आंबोलीत आज शिवजन्मोत्सव सोहळा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-२८*:-आंबोली-कामतवाडी येथील राजे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी तिथीनुसार होणारा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामतवाडी-आंबोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गुरुवार २८ रोजी सकाळी ६ वाजता शिवज्योत आगमन, ९ वाजता मूर्ती अनावरण, मूर्तिपूजन, मानवंदना, लेझीम प्रात्यक्षिक, ऐतिहासिक चित्रप्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, मनोगत, शिवव्याख्यान, स्नेहभोजन, पालखी सोहळा, धनगरी नृत्य, पारंपरिक सनई वादन, लेझीम पथक, घुमटवादन आदी कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार वैभव नाईक, पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे, शैलेश परब, राजन तेली, लखम सावंत-भोसले, महेश सारंग, संजू परब, सरपंच सावित्री पालेकर, श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे, चौकुळ सरपंच बाबू शेटवे, गेळे सरपंच सागर ढोकरे, कानूर सरपंच देवेंद्र नार्वेकर, अवधुतानंद महाराज, परमानंद महाराज, स्वामी समर्थ मठ आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे शिवचरित्रावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!