महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस कर्मचारी
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल:२९ – मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील सिंडिकेट बँक समोरील बालमवाडी कडे चुकिच्या दिशेने, जाणारा रस्त्याचा वापर वाहन चालकांनी करु नये एसटी स्टॅन्ड समोरील बॉक्स वेलचा वापर करावा. अनेक प्रकारची वाहने( नो एन्ट्री ) मध्ये चालक चालवीतआहेत. अशा नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर समज देऊन सोडत असून परत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. एका दिवशी ६०-७० जणांवर दंडात्मक कारवाई केली अशी माहिती वाहतूक पोलीस महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले पोलीस कर्मचारी हा एक माणूसच आहे तो पण नागरिकच आहे, मानवता धर्म तो स्वीकारतो, तो पोलीस प्रशासनाचा अधिकारी, कर्मचारी आहे म्हणून तो रस्त्यावर कामासाठी उभा केला जातो व जनतेला प्रबोधन करतो. नागरीकांनीही नियमांचे सुचनांचे पालन केले जावे. आपणच आपले वाहन विरुद्ध दिशेने चालवत समोरून येणाऱ्या वाहन चालकाला ठोकर देत असून त्या वाहन चालकाची चुक नसताना आपघातास आपणच कारणीभूत ठरतो .त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहन चालवने चुकीचे आहे दिलेल्या महामार्गावरुनच आपले वाहन चालविणे योग्य प्रकारे ठरेल व कसाल बाजार येथून बाहेर पडल्यावर वाहनचालकांनी बालमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर न करता कसाल एस टी स्टँड कडे जाणाऱ्या( सर्विस रोड ) व बॉक्स वेलचा वापर करून सरळ मार्गे आपण प्रवास करावा हे आपल्या सुरक्षिततेचे आहे, कोणताही अपघात होणार नाही .याबबत दक्षता द्यावी नियमांचे उल्लंघन करतील अशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे आवाहन वाहतूक महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्यामुळे अनेक ठिकाण पाचशे ते दोनशे मीटरच्या अंतरावर एकही वळण (यु टन) वाडी-वस्तीवर जाणे – येणे करण्यासाठी न राहिल्यामुळे सर्वच वाहन चालकांना चारशे- पाचशे मीटर वरून आपले वाहन परत वळवून आणावे लागत आहे हा त्रास होऊ नये म्हणून जवळचा मार्ग वाहन चालक शोधत अपघातास कारणीभूत ठरत आहे. तसे होऊ नये म्हणून विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना समज देऊन व नियमांचे पालन करावे असे प्रभोधन केले जात आहे. मोटारसायकल व वाहन चालवताना वाहन चालकांनी ( सर्व्हिस रोड ) चा उपयोग करून वाहन चालवावे.असेही मार्गदर्शन केले जात आहेे.
ओरोस जिजामाता चौक येथे ही महामार्गावर अशाच प्रकारचे अपघात घडत आहेत. वाहन चालक नियम तोडत जात आहे . जिल्हा मुख्यालयातील शासकीय इमारती मध्ये कामकाजासाठी येणाऱ्या वाहन चालक याच रस्त्याने वाहन चालवून आपले कामकाज करण्यासाठी प्रवास करीत आहेत मात्र महामार्गावर जाताना या ठिकाणी सर्कल नसल्याने वाहन चालक यांना अपघातास कारणीभूत व्हावे लागत आहे याही ठिकाणी बॉक्स वेल किंवा सर्कल करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.
यावेळी कसाल रेल्वे ब्रिज येथे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करताना पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत कदम पोलीस नाईक दिलीप पाटील आदि दिसत आहे.