Wednesday, August 12, 2026
Latest:
सावंतवाडी

माजगांव दत्तमंदिरातील आजचा दत्तजयंती उत्सव साध्या पद्धतीने होणार साजरा

 

सावंतवाडी,दि.२९:- माजगांव येथील दत्तमंदिरातील दत्तजयंती उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे देवस्थान कमिटीने ठरवले आहे.कोरोनामुळे योग्य ती खबरदारी घेऊन अगदी साध्या पद्धतीने दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरीही भाविकांनी सहकार्य करुन सोशव डिसटन्स चे पालन करुन गर्दी न करता दत्तगुरुचे दर्शन घ्यावे तसेच यंदा महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती दत्तमंदिर देवस्थान माजगांव यांच्या वतीने देण्यात आली आहे.
आज दत्तजयंती उत्सव यासाठी काल रात्रीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर आणि टिमच्या वतीने संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!