कणकवलीकरियरराजकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

प्रतिष्ठेच्या योगशिक्षक व मुल्यमापक परीक्षेत सौ.श्वेता हर्षद गावडे यांचे यश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२९: भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या योगशिक्षक व मूल्यमापक परीक्षेत कणकवली येथील माजी युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख ॲड. हर्षद गावडे यांच्या पत्नी सौ.श्वेता  गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्या आहेत. यावेळेस घेतल्या गेलेल्या परीक्षेत सिंधुदुर्ग मधुन पास होणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

या परीक्षेसाठी योगदर्शन, हठयोगप्रदीपिका, घेरंडसाहिता, हठरत्नवली, भगवतगीता असा थेअरीचा तसेच प्रॅक्टिकलसाठी षटकर्म क्रिया, सूर्यनमस्कार, आसने, मुद्रा, बंध असा कठीण अभ्यासक्रम असतो. सौ.श्वेता यांनी कणकवली तालुक्यात पतंजली अंतर्गत श्री.साधले व डॉ.रावराणे यांच्याकडे २००९ साली २५ दिवसाचे शिबीर करून योग शिक्षणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आज स्वतःचे योगवर्ग सुरू केले आहेत. गेली ४ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या योगाचा प्रसार करत आहेत.

या परीक्षेसाठी पतंजली युवाराज्य प्रभारी श्रीराम लाखे व त्यांची पूर्ण टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पश्चिम महाराष्ट्र पतंजली महिला राज्य प्रभारी सुधाताई अलीमोरे, रमाताई जोग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योगसमिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी योगाचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!