किर्लोसमधील अंगणवाड्या छप्परविना भिजत

 

सामाजिक कार्यकर्ते अर्जुन उफऀ बाळा लाड यांची चौकशीची मागणी

प्रतिनिधी सुनील आचरेकर

 

मालवण तालुक्यातील किलोऀस गावठण व बौद्ध वाडी या दोन अंगणवाड्या मंजूर असून सदर काम नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आले परंतु त्या अंगणवाडीची कौले उतरून ठेवण्यात आली परंतु अजून पर्यंत काम करण्यात आले नाही आज रोजी पावसा मध्ये पूर्णपणे दोन्ही इमारती भिजत आहेत त्यामुळे भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या दोन्ही इमारती पावसात भिजत असल्यामुळे वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगुन सुध्दा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही दुरुस्तीच्या नावाखाली इमारतीचे होत्याचे नव्हते झाले आहे याचे फार दु:ख होत आहे तसेच तोते वादळात ग्रामपंचायतीची पाणपटटी पडलेली आहे ती सुध्दा ग्रामपंचायतीला लावता आलेली नाही तसेच आंबवणे रस्त्या संदर्भात ग्रामपंचायती मध्ये चौकशी केली असता गेली दोन वर्षे मुख्यमंत्री सडक मध्ये प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते.तरी अजून पर्यत रस्ता डांबरीकरण झालेला नाही या सर्व कामांची पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!