वैभववाडी येथे आजपासून राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा
*🛑वैभववाडी येथे आजपासून राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-०४*:-ग्रामसेवा क्रीडा मंडळ, उंबर्डे यांच्यावतीने ४ मार्च रोजी सकाळी १० वा. येथील नगर पंचायतीसमोरील मैदानावर भव्य राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे १५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत राज्यातील नामांकित संघासह उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश हे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ग्राम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शेरपुद्दीन बोबडे, प्रमुख उपस्थिती म्हणून आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्यासह तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उद्योजक दत्ताजी काटे भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, उद्योजक सुनील नारकर, संदीप सरवणकर, संजय सावंत, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे, मौलाना मौलवी, विजय तावडे, भालचंद्र साठे, हुसेन लांजेकर, गुलाबराव चव्हाण, शरद नारकर, संजय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.विजेत्यास १५ हजार रुपये, उपविजेत्यास १० हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ५ हजार रुपये, ५ ते ८ पर्यंतच्या स्पर्धक संघास प्रत्येकी २ हजार रुपये, तसेच सर्व स्पर्धक संघांना आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शेरपुद्दीन बोबडे, कार्याध्यक्ष अॅड. महेश रावराणे, सचिव डॉ. विजय पांचाळ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

